‘बिघडलेला स्टारकिड’,अनिल कपूरच्या मुलाला का करताय ट्रोल? कपड्यांवरूनही नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरच्या साखरपुड्यात हर्षवर्धनने घातलेल्या कपड्यांवरून त्याला ट्रोल करण्यात आलं. तसेच त्याला बिघडलेला स्टारकीड म्हणूनही त्याची खिल्ली उडवण्यात आली.

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींना त्यांच्या अभिनयापासून ते त्यांच्या दिसण्यापर्यंत अनेक गोष्टींपर्यंत ट्रोल केलं जातं. आता त्यात अनिल कपूरच्या लेकाचीही भर पडली आहे. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. बरं त्याच्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. पण हर्षवर्धनला ट्रोल का करण्यात आलं?
अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनला का केलं जातंय ट्रोल?
अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हिने 2 ऑक्टोबर रोजी बॉयफ्रेंड रोहन ठक्करशी साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याच्या समारंभात जान्हवी कपूर, रिया कपूर, खुशी कपूर आणि सोनम कपूर यांच्यासह फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर देखील या समारंभात उपस्थित होता. बहिणीच्या साखरपुड्यात त्याने पूर्णपणे कॅज्युअल पोशाख घातला होता. यासाठी त्याला ट्रोल करण्यात आले. त्याने साखरपुड्यात जीथे सर्वजण सजून-धजून आले होते तिथे हर्षवर्धनने कॅज्युअल टीशर्ट आणि ट्रॅक पँट घातल्याने त्याला ट्रोल करण्यात आले.
View this post on Instagram
साखरपुड्याच्या समारंभात कॅज्युअल कपड्यांमध्ये पोहोचला
हर्षवर्धन कपूरला त्याची बहिणी सोनम कपूर आणि रिया कपूरसारखे डिझायनर कपडे घालायला आवडत नाही. त्याचे स्वतःचे स्टाईल स्टेटमेंट आहे. जे नेहमीच अधिक कॅज्युअल राहिले आहे. तथापि, जेव्हा तो त्याची चुलत बहीण अंशुला कपूरच्या साखरपुड्याच्या समारंभात कॅज्युअल कपड्यांमध्ये पोहोचला तेव्हा इंटरनेटवर नेटकऱ्यांनी त्याच्या कपड्यांवर आणि त्याच्या या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पांढरा टी-शर्ट, सैल ट्रॅक पँटमुळे ट्रोल
अंशुला कपूरच्या साखरपुड्यासाठी हर्षवर्धन कपूरने पांढरा टी-शर्ट, सैल ट्रॅक पँट आणि कॅज्युअल ब्लॅक जॅकेट घातला होता. त्याने केसांना पोनीटेलमध्ये कॅज्युअली बांधले होते. एका युजरने त्याच्या लूकवर कमेंट करत म्हटलं की, “यार, हा तोच शौमिक आहे ज्याबद्दल मी बोलत आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “तू तुझ्या बहिणीच्या स्टायलिस्टला काही कपडे शोधायला का सांगू नये? तर एकाने लिहिले की ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ मध्ये दिविक शर्माने बिघडलेल्या स्टारकिड शौमिकची भूमिका केली होती’ असंही म्हटलं गेलं.
- Anil Kapoor son Harshvardhan Kapoor trolled for casual attire at Anshula’s engagement
हर्षवर्धन कपूरने देखील ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे
हर्षवर्धन कपूरने कमेंटमध्ये त्यांची परिस्थिती स्पष्ट करून टीकेला उत्तर दिले. त्यांनी लिहिले, “मला काही समारंभाचे कपडे पाठवण्यात आले होते, परंतु या वर्षाच्या अखेरीस आणि पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला चित्रित होणाऱ्या एका प्रोजेक्टसाठी मी बरेच वजन कमी केले असल्याने, कपडे व्यवस्थित बसत नव्हते. समारंभासाठी खूप कमी वेळ शिल्लक होता आणि मला उशीरा जायेच नव्हते. म्हणून मी काहीतरी सामान्य आणि आरामदायक कपडे घालण्याचा निर्णय घेतला.”
हर्षवर्धनच्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या
हर्षवर्धनच्या प्रतिक्रियेवर पुन्हा काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने हर्षवर्धनच्या प्रतिक्रियेवर कमेंट केली, “त्याच्या हे लक्षात यायला हवे होते” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे “त्याच्याकडे बेसिक पॅन्ट आणि क्यजूअल शर्ट नाही का? पारंपारिक कपडे बसत नसताना हा एकमेव पर्याय होता यावर माझा विश्वास बसत नाही.” तर तिसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “तर मग हे कोणत्या प्रकारचे फिटिंगचे कपडे आहेत? हे खूपच सैल कपडे आहेत. मग तो सैल शेरवानी घालू शकला असता!”अशापद्धतीने त्याच्या या प्रतिक्रियेवरूनही त्याला ट्रोल करण्यात आलं.
