AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : त्या दोघी आसामच्या पण खणखणीत गातात शिवबाचा पाळणा, शिवजयंती पूर्णच होणार नाही त्यांच्या व्हिडीओशिवाय!

आपल्या गायनातून शिवाजीराजांना आदरांजली वाहणाऱ्या अंतरा आणि अंकिता नंदी यांच्या 'झुलवा पाळणा बाल शिवाजीचा' या गाण्याने महाराजांची जयंती उत्साहात न्हाऊन निघाली... | Ankita And Antara nandy Song

Video : त्या दोघी आसामच्या पण खणखणीत गातात शिवबाचा पाळणा, शिवजयंती पूर्णच होणार नाही त्यांच्या व्हिडीओशिवाय!
| Updated on: Feb 20, 2021 | 6:41 PM
Share

मुंबई : संपूर्ण भारतभर काल छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी झाली…. कुठे ढोलताशांचा गजर तर गुलालाची उधळण तर कुठे फटाक्यांची आतषबाजी… विविध मान्यवरांनी शिवरायांना आदरांजली वाहिली. यासगळ्यांमध्ये आपल्या गायनातून शिवाजीराजांना आदरांजली वाहणाऱ्या अंतरा आणि अंकिता नंदी यांच्या ‘झुलवा पाळणा बाल शिवाजीचा’ या गाण्याने महाराजांची जयंती उत्साहात न्हाऊन निघाली… (Ankita And Antara nandy Sung A Song Shivaji Maharaj palna On occassion of Shivjayanti)

शिवाजी महाराजांना गीतांच्या माध्यमातून यापूर्वी अनेकांनी मानवंदना दिली आहे. जयंतीदिनी अनेक गायकांच्या गायकीने राजांबद्दलचं प्रेम, अस्मिता, जाज्वल जागृत होते. पण नंदी सिस्टरने आपल्या मधुर आवाजाने शिवाजीराजांच्या जन्माचा पाळणा गाऊन महाराष्ट्राची शिवजयंती साजरी केली आहे.

पाहा त्यांनी गायलेला शिवाजीराजांच्या जन्माचा पाळणा…

नंदी सिस्टर या संधी मिळेल तशी मराठी गाणी गाण्याचा प्रयत्न करत असतात. पाठीमागच्या काही महिन्यांपूर्वी मराठीतील ठसकेबाज लावणी असलेली रेशमाच्या रेघांनी… लाल काळ्या धाग्याने ही लावणी नंदी सिस्टरने गायली होती. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी ही लावणी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. ढोकलीची साथ नसतानाही फक्त आपल्या शब्दांच्या जोरावर आणि गिटारच्या स्वरांनी गाणं किती गोड गायलं जाऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण नंदी सिस्टर आहेत…

अंकिता -अंतरा नंदी बहिणी आसामच्या अंकिता आणि अंतरा या दोघींनी याअगोदर बरीच हिट गाणी गायली आहेत. तसंच खास दिवशी स्पेशल गाणं त्या नेहमी गातात. पण शिवाजीराजेंच्या जयंतीदिनी बाल शिवाजीचा पाळणा गायलेल्या नंदी सिस्टर महाराष्ट्राने डोक्यावर घेतल्यात… नंदी सिस्टर या मूळच्या आसामच्या… पण आपल्या गायकीच्या जोरावर त्यांनी देशातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयात हक्काचं स्थान मिळवलंय…

अंतरा नंदीने आपलं शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलंय… तसंच महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसीस इंटरनॅशनल युनिव्हरसिटीतून पूर्ण केलंय. तर गाण्याचे धडे पद्मश्री उस्ताद रशीद यांच्याकडे गिरवले आहेत. झी टीव्हीवर लोकप्रिय असलेला संगीत कार्यक्रम सारेगमप लिटील चॅम्प्सच्या अंतिम तीनमध्ये अंतराने जागा मिळवली होती.

मिळालेले पुरस्कार अंतराला 2000 साली बेस्ट गायकीचा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. आपल्या गोड आवाजाने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 2013 साली म्युझिक स्टार अॅवॉर्डची अंतरा मानकरी ठरली. पुढे 2015 मध्ये दिल्ली इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आणि मुंबई इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्तम संगीतकार पुरस्कारावर नंदी सिस्टरने नाव कोरलं..

संबंधित बातम्या : 

Video : माग पळून पळून वाट माझी लागली, अन्… शालूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | शिवजयंतीला सर्वाधिक गाणं कोणतं वाजतंय? आदर्श शिंदेचं गाणं लाखोंनी बघितलं, तुम्ही पाहिलं?

Video : ‘पाळणा बाळ शिवाजीचा’, पाहा शालूचा मराठमोळा अवतार

(Ankita And Antara nandy Sung A Song Shivaji Maharaj palna On occassion of Shivjayanti)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.