Annu Kapoor | 65 व्या वर्षी इंटिमेट सीन, प्रियांका चोप्राशी वाद; अन्नू कपूर यांचं कॉन्ट्रोवर्शियल आयुष्य

अन्नू कपूर यांचं बालपण फार गरीबीत गेलं. सुरुवातीला त्यांना अभिनेता नव्हे तर IAS अधिकारी बनायचं होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्वप्न पूर्ण करता आलं नाही. संघर्षाच्या काळात त्यांनी चहाची टपरी चालवून घराचा गाडा चालवला.

Annu Kapoor | 65 व्या वर्षी इंटिमेट सीन, प्रियांका चोप्राशी वाद; अन्नू कपूर यांचं कॉन्ट्रोवर्शियल आयुष्य
Annu KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 2:00 PM

मुंबई : टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘अंताक्षरी’ हा शो पाहिला नसेल अशी क्वचितच एखादी व्यक्ती असेल. या शोचं सूत्रसंचालन अभिनेते अन्नू कपूर करायचे. 1983 मध्ये ‘मंडी’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र त्यांना बॉलिवूडमध्ये ‘उत्सव’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आज त्यांचा 67 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात..

अन्नू कपूर यांचं बालपण फार गरीबीत गेलं. सुरुवातीला त्यांना अभिनेता नव्हे तर IAS अधिकारी बनायचं होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्वप्न पूर्ण करता आलं नाही. संघर्षाच्या काळात त्यांनी चहाची टपरी चालवून घराचा गाडा चालवला. याशिवाय त्यांनी लॉटरीची तिकिटं विकण्याचंही काम केलं.

प्रियांकाने केलं होतं रिजेक्ट

अन्नू कपूरने ‘सात खून माफ’ या चित्रपटात प्रियांकाच्या सात पतींपैकी एका पतीची भूमिका साकारली होती. मात्र या शूटिंगदरम्यान काही असे किस्से घडले, ज्यांचं नंतर वादात रुपांतर झालं. याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा अन्नू कपूर यांनी सांगितलं होतं की प्रियांका चोप्राने त्यांच्यासोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला होता. “मी दिसायला चांगला नाही आणि हिरो नाही म्हणून तिने नकार दिला”, असं कारण त्यांनी सांगितलं होतं. नंतर हा वाद बराच काळ ताणला गेला.

हे सुद्धा वाचा

वयाच्या 65 व्या वर्षी इंटिमेट सीन

अन्नू कपूर यांनी त्यांच्या करिअरमध्ये इतके बोल्ड सीन कधीच दिले होते, जितके त्यांनी एका वेब सीरिजमध्ये दिले असतील. अल्ट बालाजीच्या पौरुषपूर या सीरिजमध्ये त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दिले. या सीरिजने त्यावेळी अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

अन्नू कपूर यांचं दोनदा लग्न

चित्रपटांसोबतच त्यांचं खासगी आयुष्यही चर्चत होतं. अन्नू कपूर यांनी 1992 मध्ये अमेरिकन महिलेशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या वर्षभरानंतरच दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. मग अन्नू कपूर यांच्या आयुष्यात अरुणिताची एण्ट्री झाली. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे. दुसऱ्या लग्नानंतरही अन्नू कपूर हे पहिल्या पत्नीच्या संपर्कात होते. ते लपूनछपून तिला भेटायला जायचे.

काही काळानंतर अरुणिता यांना संशय येऊ लागला आणि अखेर त्यांना अन्नू कपूर यांचं सत्य समजलं. 2005 मध्ये अन्नू कपूर यांचा दुसरा घटस्फोट झाला. अरुणिताशी विभक्त झाल्यानंतर काही काळाने अन्नू कपूर यांनी पुन्हा एकदा पहिली पत्नी अनुपमाशी लग्न केलं. 2008 मध्ये या दोघांनी लग्न केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.