अर्चना पूरन सिंग गंभीर आजाराच्या विळख्यात… ज्यावर उपचार शक्यच नाही… कोणता आहे ‘तो’ आजार?
सर्वांना हसवणारी अर्चना पूरन सिंग हिला गंभीर आजाराने ग्रासलं... ज्यावर कोणते उपचारच नाहीत... आजाराबद्दल जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्चना हिच्या आजाराची चर्चा...

बॉलिवूची प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पुरण सिंग (Archana Puran Singh) हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अर्चना हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही दिवसांपासून अर्चना विनोदवीर कपिल शर्मा याच्या शोमुळे चर्चेत आहे. शोच्या माध्यामातून सर्वांना हसवणाऱ्या अर्चना हिला गंभीर आजाराने ग्रासलं आहे. खुद्द अभिनेत्रीच्या मुलाने आईच्या गंभीर आजाराबद्दल सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्चना हिला अशा आजाराने ग्रासलं आहे, ज्यावर उपचार शक्यच नाहीत.
सांगायचं झालं तर, अर्चना पूरण सिंग कायम तिच्या यूट्यूबच्या माध्यमातून तिच्या रोजच्या जीवनातील माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अर्चना हिची दोन मुलं देखील त्यांच्या आयुष्याबद्दल फार काही सांगत असतात. तर याच दरम्यान, अभिनेत्रीच्या मुलाने आईच्या गंभीर आजारावर मौन सोडलं. अर्चना हिचा मुलगा आयुष्मान याने सांगितलं की, त्याच्या आईचा हात आता पूर्वी सारखा कधीच होणार नाही.
आयुष्मान म्हणाला, ‘मला माझ्या आईवर गर्व आहे. मागचं वर्ष माझ्या आईसाठी फार कठीण वर्ष होतं. तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं आणि तिला एका दुर्मिळ आजाराने ग्रासलं. CRPS ज्यामुळे माझ्या आईचा हात आता कधीच पूर्वीसारखा होणार नाही.’
‘असं असताना देखील तिने 2 – 3 सिनेमांमध्ये काम केलं. एवढंच नाही तर, एक वेब सीरिज देखील शूट केली. एक महिना तर पूर्ण 30 दिवस ती काम करत होती. पण तिने कधीच तक्रार केली नाही. वयाच्या 60 व्या वर्षी तिने युट्यूब चॅनल सुरु केलं आणि नवीन गोष्टी ट्राय केल्या… जी एक चांगली गोष्ट आहे…’, मुलाकडून होणारं कौतुक ऐकून अर्चना हिच्या डोळ्यात पाणी आलं.
अर्चना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अर्चनाने मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. ‘जलवा’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘मोहब्बतें’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या सिनेमांमधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. टेलिव्हिजनवरही अर्चना यशस्वी ठरली. ‘श्रीमान श्रीमती’, ‘जाने भी दो पारो’, ‘जुनून’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं.
अर्चना सोशल मीडियावर देखील कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वत:चे आणि कुटुंबियांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अर्चनाच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
