पहिले मित्राची बहिण, मग वहिनी; एकाच घरातील दोघींवर प्रेम… अभिनेता आता फिरतोय एकटा
बॉलिवूडमधील अनेक स्टार्सच्या प्रेमकथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक अभिनेता पहिले मित्राच्या बिहणीच्या प्रेमात पडला आणि नंतर वहिनीच्या. आता हा अभिनेता कोण? चला जाणून घेऊया...

प्रेमाला ना वय दिसतं, ना रंग, ना धर्म, ना जात. प्रेम हे आंधळं असतं. माणूस ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहातो. आत्तापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत असे शेकडो चित्रपट बनले आहेत, ज्यात प्रेमाच्या वेगवेगळ्या कथा दाखवल्या गेल्या आहेत. पण कधी कधी हिंदी सिनेसृष्टीतील तारेही प्रेमाचे विचित्र किस्से विणतात. एका अभिनेत्याने तर कहर केला होता. तो एकाच कुटुंबातील दोन महिलांच्या प्रेमात पडला होता. पण आता हा अभिनेता एकटा राहात आहे. हा अभिनेता कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुन कपूर आहे. एक काळ असा होता की अर्जुन कपूर सलमान खानच्या कुटुंबाच्या खूप जवळ होता. तो सलमानलाही आपला गुरू मानत होता. अर्जुन कपूरला इंडस्ट्रीत येण्यासाठी तयार करण्यातही सलमानने मदत केली. त्यावेळी अर्जुन कपूर सलमानची बहीण अर्पिता खानला डेट करत होता. अर्जुन वयाच्या 18 व्या वर्षी अर्पिताच्या प्रेमात पडला होता.अर्जुननेही या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलला होता.
वाचा: हा बाबासाहेबांचा संघर्ष! जय भीम, जय संविधान; गौरव मोरेच्या ‘जयभीम पँथर’चा ट्रेलर पाहिलात का?
त्यानंतर मलायकाच्या प्रेमात
मलायका अरोराने सलमानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केले होते. 1998 मध्ये दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. पण हे नाते 2017 पर्यंतच टिकले आणि दोघांचा घटस्फोट झाला. अरबाजपासून घटस्फोट झाल्यानंतर काही काळानंतर अर्जुन आणि मलायका यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. दोघांनीही काही काळ त्यांच्या नात्यावर मौन पाळले आणि नंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करून सर्व काही सार्वजनिक केले. या रिलेशनशिपनंतर सलमान अर्जुनवर चांगलाच चिडला असल्याचे बोलले जाते.
आता अर्जुन सिंगल आहे
मलायका अरोरासोबत अर्जुन कपूरचे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोघांच्या वयात १२ वर्षांचा फरक होता, यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण जोपर्यंत दोघे एकत्र होते तोपर्यंत त्यांनी कशाचीच पर्वा केली नव्हती. झूमवरील रिपोर्टनुसार, नोव्हेंबर २०२३ मध्ये मलायका आणि अर्जुनचे नाते तुटले. लग्नाबाबत वाद झाल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांनी 2016 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. म्हणजे अर्जुन त्याच्या मित्राची बहिण आणि वहिनी या दोघांच्याही प्रेमात पडला होता. पण सध्या त्याचे दोघांसोबतचे नाते तुटले आहे आणि तो सध्या सिंगल आहे.
