AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिली तेव्हा ते मीमच आठवलं..; थलपती विजय यांच्या भन्नाट प्रतिक्रियेचा अभिनेत्याकडून खुलासा

तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन सर्जा याने नुकतीच तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय जे 'थलपती विजय' म्हणून ओळखले जातात, त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विजय यांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कसं वाटतंय, याविषयी रंजक प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिली तेव्हा ते मीमच आठवलं..;  थलपती विजय यांच्या भन्नाट प्रतिक्रियेचा अभिनेत्याकडून खुलासा
थलपती विजय आणि अर्जुन सर्जाImage Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2026 | 1:45 PM
Share

तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यापासून विविध कलाकार त्यांची भेट घेत आहेत. नुकतंच अभिनेता अर्जुन सर्जानेही त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा रंजक किस्सा अर्जुनने हैदराबादमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सांगितला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कसं वाटतंय, याविषयी बोलताना विजयने सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या एका मीमचा उल्लेख केला. विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ‘मुधल्वन’ या चित्रपटावरून मीम्स व्हायरल झाले होते.

एस. शंकर दिग्दर्शित ‘मुधल्वन’ या चित्रपटाची कथा एका पत्रकाराभोवती फिरते, जो अनपेक्षितपणे एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनतो आणि राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई करतो. विशेष म्हणजे या चित्रपटातील मुख्य भूमिकेची ऑफर सर्वांत आधी विजय यांनाच मिळाली होती. मात्र काही कारणास्तव विजय यात काम करू न शकल्याने नंतर अर्जुन सर्जाकडे ती भूमिका गेली. 1990 च्या दशकात तमिळ सिनेसृष्टीतील हा सर्वांत गाजलेला चित्रपट आहे. त्यामुळे जेव्हा विजय जेव्हा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले, तेव्हा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील घडामोडी ‘मुधल्वन’ या चित्रपटाच्या कथेशी जोडण्यास सुरुवात केली. त्यावरून मीम्स बनवून व्हायरल करण्यात आले.

व्हायरल मीम

View this post on Instagram

A post shared by Bhavesh (@itsdearbhavesh)

अर्जुन सर्जाने जेव्हा विजय यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी स्वत:हून ‘मुधल्वन’ चित्रपटावरून व्हायरल झालेल्या मीम्सचा उल्लेख केला. याविषयी अर्जुन म्हणाला, “विजय मुख्यमंत्री बनल्यानंतर मी त्यांची नुकतीच भेट घेतली. त्यांनी चित्रपटाचे मीम्स पाहिल्याचं मला सांगितलं. जेव्हा त्यांनी सर्वांत आधी मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिली, तेव्हा त्यांना माझ्या ‘मुधल्वन’ याच चित्रपटाची आठवण झाल्याचं त्यांनी मला सांगितलं.” यावेळी अर्जुनने चित्रपटसृष्टीतील व्यक्ती इतक्या मोठ्या राजकीय पदावर पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्री होणं हे मोठं यश असल्याचं म्हणत त्याने विजय यांच्या कामगिरीचं कौतुक केलं.

View this post on Instagram

A post shared by Arjun Sarja (@arjunsarjaa)

थलपती विजय आणि अर्जुन सर्जा यांनी यापूर्वी लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘लिओ’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात दोघांनी भावांची भूमिका साकारली होती. विजय यांच्या भेटीनंतर अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. ‘आमचे प्रिय मुधल्वन, सी. जोसेफ विजय अव्ल यांच्यासोबत. ते मोठ्या जबाबदारीला मोठ्या सन्मानाने सामोरं जात असताना त्यांना शक्ती, उत्तम आरोग्य आणि मार्गदर्शनासाठी शुभेच्छा’, अशी पोस्ट अर्जुनने लिहिली आहे. या कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना अर्जुनला स्वत:ला राजकारणात येण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारताच ‘मी आनंदी राहावं असं तुम्हाला वाटत नाही का’, असं गमतीशीर उत्तर त्याने दिलं.

Follow Us
इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना येऊ नका, सरकारचं मोठं आवाहन
Alandi Indrayani River Flood | पालखीपूर्वीच आळंदी संकटात! इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना येऊ नका, सरकारचं मोठं आवाहन
निसर्गाचा चमत्कार! अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधाबा प्रवाहित
निसर्गाचा चमत्कार! अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधाबा प्रवाहित
KDMC तील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकत्यांवर थेट कारवा
KDMC तील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकत्यांवर थेट कारवाईचा इशारा, श्रीकांत शिंदेंची पोस्ट चर्चेत
सचिन अहिर पहिला बॉम्ब... आता अजून स्फोट होणार!
मोठी घडामोड! सचिन अहिर पहिला बॉम्ब... आता अजून स्फोट होणार; हिंदुस्थानी भाऊचा मोठा राजकीय दावा
शरद पवार सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यानच आणखी वेगळंच घडलं! पक्षातील
शरद पवार सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यानच आणखी वेगळंच घडलं! पक्षातील नेत्यांकडून भाजप मंत्र्याचं तोंडभर कैतुक
राजकीय हालाचालींना वेग! संजय राऊतांचं नितेश राणेंना पत्र, थेट म्हणाले
राजकीय हालाचालींना वेग! संजय राऊतांचं नितेश राणेंना पत्र, थेट म्हणाले...
महाराष्ट्राच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावलं; पूरस्थितीवर शाह-फडणवीस
मोठी बातमी! महाराष्ट्राच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावलं; पूरस्थितीवर अमित शाह-फडणवीसांमध्ये चर्चा
रस्त्यावर चालत होता, अचानक बेस्ट बसने मागून धडक दिली अन् पुढे जे घडलं
रस्त्यावर चालत होता, अचानक बेस्ट बसने मागून धडक दिली अन् पुढे जे घडलं...
सर्वत्र धुकं पसरलं अन् विचित्र असा वास... एमआयडीसीत भीषण कार्बन गॅस
MIDC | सर्वत्र धुकं पसरलं अन् विचित्र असा वास... एमआयडीसीत भीषण कार्बन डायऑक्साइड गॅस गळती
नदीचं पाणी ओसरलं अन् मगर थेट रस्त्यावर आली; व्हिडीओ होतोय व्हायरल
रायगडमध्ये खळबळ! नदीचं पाणी ओसरलं अन् मगर थेट रस्त्यावर आली; व्हिडीओ होतोय व्हायरल