AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थरार, गूढ आणि भय, मराठीतील 4 मोठे कलाकार पहिल्यांदाच एकत्र; ‘असंभव’चा ट्रेलर पाहिलात का?

'असंभव' हा सचित पाटील दिग्दर्शित नवा मराठी रहस्यमय आणि थरारक चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. मुक्ता बर्वे, प्रिया बापट, सचित पाटील आणि संदीप कुलकर्णी हे चार प्रमुख कलाकार पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.

थरार, गूढ आणि भय, मराठीतील 4 मोठे कलाकार पहिल्यांदाच एकत्र; 'असंभव'चा ट्रेलर पाहिलात का?
Asambhav
| Updated on: Nov 11, 2025 | 9:21 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय जोडणारा असंभव हा रहस्यमय आणि थरारक चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सचित पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवत आहे. ज्यामुळे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

असंभव या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर निर्माण झालेले गूढ, ट्रेलरने आणखी वाढवले आहे. ट्रेलरच्या पहिल्या फ्रेमपासूनच प्रेक्षक एका विलक्षण आणि रहस्यमय जगात प्रवेश करतात. नैनितालच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि शुभ्र धुक्याच्या सान्निध्यात एका गूढ हवेलीमध्ये ही कथा घडते. ट्रेलरमधील भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील संगमातून आकार घेणारी एक असामान्य घटना दर्शवते. हवेलीतील अघटित प्रकार, शांततेत दडलेली भीती आणि प्रत्येक पात्राच्या डोळ्यांतील रहस्य काहीतरी मोठे गुपित दडलेले असल्याची जाणीव करून देते.

मराठीतील चार प्रमुख कलाकार पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर

या चित्रपटात सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे मराठीतील चार प्रमुख कलाकार पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. या ट्रेलरमधून ‘असंभव’ची अनोखी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुनर्जन्म ही संकल्पना मराठी चित्रपटात फार कमी वेळा साकारण्यात आली आहे. रहस्य, थरार, भावना आणि वास्तव यांचा मिलाप असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल. प्रत्येक पात्राचं जग उलगडताना, प्रेक्षक त्यांच्या भावनांशी एकरूप होतील, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक सचित पाटील यांनी दिली.

‘असंभव’ हा केवळ एक रहस्यपट नाही, तर तो भावनांचा आणि नात्यांचाही अनुभव आहे. हा चित्रपट तयार करताना आम्ही प्रत्येक क्षण अनुभवता यावा यावर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे यातील रहस्य, भावना आणि नात्यांचा गुंता या चित्रपटाला वेगळेपण देतो, अशी प्रतिक्रिया निर्माते नितीन वैद्य यांनी दिली.

‘असंभव’ चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केले आहे. तर पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. ‘मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य चित्रपटाचे निर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा येत्या २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

पाहा ट्रेलर 

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.