AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशाताईंचं 45 वर्षांपूर्वीचं अजरामर गाणं, ज्याचे बोल घेतात काळजाचा ठाव, रेखाच्या डान्समुळेही ठरलं सर्वांचं फेव्हरेट!

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे दु:खद निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी आपल्या करिअरमध्ये हजारो गाणी गायली. त्यातील काही गाणी आजही आवडीने ऐकली जातात. एक गाणे तर आजच्या तरुणांमध्येही खूपच प्रसिद्ध आहे.

आशाताईंचं 45 वर्षांपूर्वीचं अजरामर गाणं, ज्याचे बोल घेतात काळजाचा ठाव, रेखाच्या डान्समुळेही ठरलं सर्वांचं फेव्हरेट!
asha bhosle and song in aankhon ki mastiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2026 | 7:12 PM
Share

Asha Bhosle Famous Songs : गायन जगतातील प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवुड पोरके झाल्याची भावना व्यक्त केली जात आहेत. आशा भोसले यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. यातील काही गाण्यांना 40 ते 50 वर्षे झालेली आहेत. परंतु अजूनही आशाताईंनी गायलेल्या या गाण्यांची तेवढीच क्रेझ आहे. आजकालची जेन झी देखील आशाताईंनी गायलेली गीते आवडीने ऐकते. यातीलच एक गाणे लोकांना खूप आवडते. हे गाणे अजूनही लाखो लोकांच्या आवडीचे आहे.

ते प्रसिद्ध गाणं कोणतं?

आशाताईंनी आपल्या गायनातील करिअरमध्ये आतापर्यंत हजारो गाणी गायलेली आहेत. विशेष म्हणजे ही गाणी फक्त मराठी किंवा हिंदी भाषेतलीच नाहीत. इतरही भाषांत त्यांनी गाणी गायलेली आहेत. त्यांनी गायलेल्या काही गाण्याचे बोल आजही काळजाचा ठाव घेतात. त्यांच्या अशाच एका गाण्याचे नाव ‘इन आँखोंकी मस्ती’ असे आहे. या गाण्याला आशाताईंचा आवाज आहे. या गाण्यात आशाताईंच्या आवाजाची जादू पाहायला मिळते. उमराव जान या चित्रपटातील हे गीत आहे.

रोज हजारो लोक ऐकतात ते गाणं

उमराव जान हा चित्रपट 1981 साली रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेत्री रेखाचीही भूमिका आहे. एकीकडे आशाताईंचा आवाज आणि त्याच्या जोडीला अभिनेत्री रेखाचे नृत्य यामुळे हे गाणे अजरामर झाले. हे गाणे 90 च्या दशकात जन्मलेल्या लोकांच्या खूपच आवडीचे आहे. परंतु आजकालची जेन झी पिढीदेखील हे गीत आवडीने ऐकते आणि गाते. आशाताईंच्या निधनानंतर आता या गाण्याची आठवण काढली जात आहे.

इतरही अनेक गाणी प्रसिद्ध

दरम्यान, आशाताईंनी गायलेली अनेक गितं आजही प्रसिद्ध आहेत. ये मेरा दिल, ओ हसिना जुल्फो वाली, चुरा लिया है तुमने जो दिल को, केहदू तुम्हे या चुप रहूँ, सजना है मुझे असे गाणे आजही लाखो लोक ऐकतात. यूट्यूबवर या गाण्याचा व्हिडीओ तसेच ऑडिओ लोक सर्च करून ऐकतात.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा