Ashish Vidyarthi | ‘दुःखी होवून आता मी स्वतःला संपवू….’, दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांच्यावर का आली अशी वेळ?

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांची झाली अशी अवस्था? सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याचीच चर्चा...

Ashish Vidyarthi | 'दुःखी होवून आता मी स्वतःला संपवू....', दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांच्यावर का आली अशी वेळ?
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 12:34 PM

मुंबई : अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी दुसरं लग्न केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंग आहे. दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी यांच्यावर अशी वेळ आली, ज्यामुळे अभिनेत्या ‘दुःखी होवून आता मी स्वतःला संपवू….’ असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्या पत्नीसोबत संसार थाटल्यामुळे अनेकांनी आशिष विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या, तर काही नेटकऱ्यांनी मात्र अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. दुसऱ्या लग्नामुळे आशिष विद्यार्थी यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे आशिष विद्यार्थी आणि दुसरी पत्नी रुपाली बरुआ यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या लग्नानंतर भूमिका स्पष्ट केली आहे. आशिष विद्यार्थी म्हणाले, ‘दुसऱ्या लग्नानंतर अनेकांनी माझ्यासाठी अपमानजनक शब्दांचा प्रयोग करत मला ट्रोल केलं. माझ्या वयाबद्दल अनेक गोष्टी मी ऐकल्या. मला कळत नाही इतक्या खालच्या शब्दांचा प्रयोग कोण करु शकतं…’

हे सुद्धा वाचा

‘प्रत्येक जण त्यांच्या आयुष्यात वृद्ध होणार आहे. मी दुसरं लग्न केलं, त्यात मी काय वाईट केलं. मी एक जबाबदार नागरीक आहे. मी टॅक्स भरतो, प्रत्येक गोष्टीचं बिल भरतो… मी भारतीय नागरिक आहे, तर मला माझ्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार नाही. मी माझ्या आयुष्यावर प्रेम करतो. ट्रोलिंगमुळे माझी पत्नी देखील कंटाळली आहे. ज्यांचं वय वाढत आहे, त्यांनी दुःखी होवून स्वतःला संपवायला हवं का? आयुष्यात कोणाची साथ हवी असेल तर, लग्न का करु नये?’ असं देखील अभिनेते आशिष विद्यार्थी म्हणाले…

आशिष विद्यार्थी पुढे म्हणाले, ‘व्यक्ती म्हणून आपण एकमेकांच्या भावनांचा आदर करायला हवा. आता जे काही होत आहे, त्याची मी अपेक्षा देखील केली नव्हती. जर एखादा व्यक्ती वृद्ध होत असेल तर त्याचा सांभाळ कोण करेल, जे ट्रोल करत आहेत, ते करतील का? आयुष्यात आनंदी राहण्याचा अधिकार सर्वांना आहे. मला माझ्या आयुष्यात आनंद हवा आहे…’ असं देखील ट्रोल करणाऱ्यांना खडसावत आशिष विद्यार्थी म्हणाले.

बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष व‍िद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. रुपाली हिचं देखील आशिष यांच्यासोबत दुसरं लग्न आहे. रुपाली हिला एक मुलगी असून तिच्या पहिल्या पतीचं निधन झालं आहे. कोलकाता याठिकाणी ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत आशिष विद्यार्थी यांनी लग्न केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.