AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यावरचं संकट आईने अंगावर घेतलं..; अशोक सराफ यांच्या आयुष्यातील मोठी खंत

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या आयुष्यातील हा अत्यंत भावनिक क्षण होता. अपघातानंतर ते जवळपास दोन महिने रुग्णालयात होते. याविषयीची कल्पनासुद्धा त्यांच्या आईला नव्हती आणि अचानक एके दिवशी..

माझ्यावरचं संकट आईने अंगावर घेतलं..; अशोक सराफ यांच्या आयुष्यातील मोठी खंत
Ashok SarafImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 03, 2025 | 3:34 PM
Share

‘मामला पोरींचा’ या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी अशोक सराफ यांना कोल्हापूरला जायचं होतं. याच प्रवासादरम्यान 17 एप्रिल 1987 रोजी त्यांचा अपघात झाला होता. हा अपघात इतका मोठा होता की अशोक सराफ त्यांच्या गाडीच्या सीटसकट बाहेर फेकले गेले होते. पुण्यातल्या संचेतीमध्ये त्यांच्यावर बरेच दिवस उपचार सुरू होते. त्यावेळी चारुदत्त सरपोतदार आणि अजय सरपोतदार यांनी त्यांची खूप काळजी घेतली होती. कारण अशोक सराफ यांची आई त्यावेळी आजारी होती, म्हणून त्यांना मुलाच्या अपघाताविषयी काहीच सांगितलं नव्हतं. जवळपास दोन महिने अशोक सराफ रुग्णालयात होते. त्या काळातली एक नकोशी आठवण अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात सांगितली आहे.

आई आजारी होती म्हणून त्यांना अशोक सराफ यांच्या अपघाताविषयी काहीच सांगितलेलं नव्हतं. अशोक कुठेय असं विचारल्यावर शूटिंग करतोय असं उत्तर त्यांना दिलं जायचं. 9 मे 1987 रोजी अशोक सराफ यांच्या आईने अखेरचा श्वास घेतला. तेव्हा अशोक सराफ पुण्यातच हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना आईला भेटताही आलं नव्हतं. “तिच्या त्या शेवटच्या काळात मी तिच्याबरोबर असायला हवं होतं. तिलाही माझी आठवण येत असणार. मला बघावंसं वाटत असणार. शूटिंग असलं तरी अशोक भेटायलाही येत नाही म्हणजे काहीतरी बिघडलंय असं वाटलं असेल का तिला? तिला काही जाणवलं असावं का? मी हॉस्पिटलमध्ये होतो म्हणून नाहीतर आईचं जाणं मी कसं सहन करू शकलो असतो? माझ्यावरची आपत्ती आईनं आपल्या अंगावर घेतली असा माझा विश्वास आहे”, अशा शब्दांत त्यांनी या आत्मचरित्रात भावना व्यक्त केल्या.

गंभीर अपघातातून अशोक सराफ पूर्णपणे बरे होईपर्यंत ‘मामला पोरींचा’ या चित्रपटाचे निर्माते थांबले होते. 6 सप्टेंबर 1987 रोजी मुंबईच्या हॉटेलमध्ये या चित्रपटाचा मुहूर्त आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अशोक सराफ पुन्हा एकदा नव्या जोमानं कॅमेऱ्यासमोर उभे राहिले होते. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या घशात आवंढा दाटून आला होता. डोळ्यांतून कुठल्याही क्षणी ओघळतील अशी त्यांची अवस्था झाली होती. अशोक सराफ यांची दुसरी इनिंग सुरू झाली होती. त्यांचा तो पुनर्जन्मच होता.

जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स.
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न.
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान.
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?.
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल.