Marathi Movie : आर्ची दाखवणार ‘आठवा रंग प्रेमाचा’, नव्या चित्रपटाची घोषणा

Marathi Movie : आर्ची दाखवणार 'आठवा रंग प्रेमाचा', नव्या चित्रपटाची घोषणा

सैराट या चित्रपटात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता सर्वांची लाडकी आर्ची नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना ‘आठवा रंग प्रेमाचा’ दाखवणार आहे. (Athava Ranga Premacha, Rinku Rajguru's new marathi movie)

VN

|

Mar 17, 2021 | 4:55 PM

मुंबई : सैराट या चित्रपटात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता सर्वांची लाडकी आर्ची नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना ‘आठवा रंग प्रेमाचा’ दाखवणार आहे. ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचे टायटल सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. (Athava Ranga Premacha, Rinku Rajguru’s new marathi movie)

चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

आदिनाथ पिक्चर्स, राकेश राऊत प्रॉडक्शन्स आणि टॉप अँगल प्रोडक्शननं ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

प्रेमाचा वेगळा रंग दाखवणारा नवा चित्रपट

प्रेम ही संकल्पनाच चिरंतन राहणारी असल्यानं आतापर्यंत प्रेमावरचे अनेक चित्रपट येऊन गेले आणि या पुढेही येत राहतील. ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट प्रेमाचा वेगळा रंग दाखवणार आहे. त्यामुळे आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

समीर कर्णिक यांचं निर्माता म्हणून मराठीत पहिलं पाऊल

समीर कर्णिक यांनी ‘क्युं हो गया ना..’ या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर ‘यमला पगला दिवाना’, ‘चार दिन की चांदनी’, ‘हिरोज’,  ‘नन्हे जैसलमेर’ अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर यांनी केलं आहे. त्यामुळे बॉलिवूडमधला मोठा अनुभव गाठीशी घेऊन समीर आता निर्माता म्हणून मराठीत पहिलं पाऊल टाकत आहेत.

संबंधित बातम्या

मराठी मनोरंजन विश्वातल्या ‘या’ प्रसिद्ध जोडीला कोरोनाची लागण, घरातच झालेयत सेल्फ क्वारंटाईन

Picasso : वडील आणि मुलाच्‍या नात्याची कथा सोबतच कोकणातल्या लोकजीवनाची झलक, ‘पिकासो’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें