AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 तास 16 मिनिटांचा हा पिक्चर म्हणजे जबरदस्त mind game , प्रत्येक सीनमध्ये मोठा ट्विस्ट, OTT वर कुठे पहाल?

दाक्षिणात्य देशांमध्ये अनेक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहेत आणि आज आपण अशाच एका चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा क्लायमॅक्स पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

2 तास 16 मिनिटांचा हा पिक्चर म्हणजे जबरदस्त mind game , प्रत्येक सीनमध्ये मोठा ट्विस्ट, OTT वर कुठे पहाल?
या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून डोकंच हलेल Image Credit source: social media
| Updated on: Apr 02, 2026 | 3:04 PM
Share

बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अर्थात साऊथमध्येही असे अनेक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहेत, ज्यांच्या कथेला प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळाली आहे. आजही हा प्रकार प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. असे अनेक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहेत, त्यापैकी काही लोकांनी कदाचित आधीच पाहिले असतील, तर काही जण नवीन चित्रपटांच्या शोधात असतील. तर आज आपण अशाच एका उत्कृष्ट दाक्षिणात्य चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या अंगावर अक्षरश : काटा येईल. या चित्रपटाच्या कथेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एवढंच नव्हे तर या चित्रपटातील सस्पेन्स-थ्रिलरने प्रेक्षकांना थक्क करून सोडलं. असा कोणता आहे हा चित्रपट आणि ओटीटीवर तो कुठे पाहू शकतो, ते जाणून घेऊया.

क्लायमॅक्स पाहून डोकंच हलेल

हिंदीप्रमाणेच साऊथमध्ये असे अनेक धमाकेदार चित्रपट आहेत, ज्यामुळे प्रेक्षक अनेक तास स्क्रीनसमोर खिळून बसतील. त्यापैकीच एक सिनेमा म्हणजे ‘अथिरन’. 2 तास 16 मिनिटांचा हा सस्पेन्स चित्रपट ओटीटीवर सगळ्यात जास्त वेळा पाहिला गेलाय. या चित्रपटाच्या कास्टिंगपासून ते सस्पेन्सपर्यंत प्रत्येक गोष्टी अशी आहे, की तुम्ही शेवटपर्यंत एका जागी खिळून रहाल.

या चित्रपटाच्या कास्टबद्दल सांगायचं झालं तर त्यमध्ये फहद फासिल, साई पल्लवी, अतुल कुलककर्णी, रेन्जी पणिक्कर यांच्यासह अनेक स्टार्स हे प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक थॉमस वर्गीस यांनी केलं असून, पटकथा पी. एफ. मॅथ्यूज यांनी लिहिली आहे. हा चित्रपट ‘स्टोनहर्स्ट असाईलम’ या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित आहे. मल्याळम आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट सहज पाहता येतो.

काय आहे कहाणी ?

‘अथिरन’ चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, ही एका मानसोपचारतज्ज्ञाची कथा आहे. डॉ. नायर (फहाद फासिल) केरळच्या एका दुर्गम भागातील मनोरुग्णालयाला भेट देतो, जिथे त्याची भेट नित्या (साई पल्लवी) नावाच्या एका रुग्णाशी होते, तिला एकांतवासात ठेवण्यात आलेलं असतं. पण जसजसं सत्य समोर येतं… तसतसं सगळंच बदलत जातं. कोण वेडं… आणि कोण शहाणं? खरं काय… आणि खोटं काय? हळूहळू तिच्या भूतकाळातील अशी रहस्ये उघड होतात, जी तुम्हाला थक्क करून सोडतील. जेव्हा climax येतो, तेव्हा खरंच डोक्याला हात लावाल. एवढा जबरदस्त चित्रपट आहे हा.

ओटीटीवर कुठे पाहता येईल सिनेमा ?

‘अथिरन’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर अव्हेलेबल असून तो हिंदीतही पाहता येईल. एवढंच नव्हे तर हा पिक्चर यूट्यूब वर देखील फ्री मध्ये उपलब्ध आहे. IMDB वर या चित्रपटांचं रेटिंग 6.7 इतकं आहे. नक्की बघा हा चित्रपट.

Follow Us
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.