AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पहिल्या एनिव्हर्सरीचे फोटो लीक, पत्नीसाठी केलेली खास व्यवस्था

Love Life | 'असा नवरा असेल तर मग काय...', प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पहिल्या एनिव्हर्सरीचे फोटो सोशल मीडियावर लीक, पत्नीसाठी केलेली खास व्यवस्था पाहून चाहते थक्क, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रिकेटरच्या खासगी आयुष्याची चर्चा...

प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पहिल्या एनिव्हर्सरीचे फोटो लीक, पत्नीसाठी केलेली खास व्यवस्था
| Updated on: Jun 19, 2024 | 2:54 PM
Share

झगमगत्या विश्वात कायम सेलिब्रिटींच्या खासगी आणि रॉयल आयुष्याची चर्चा रंगलेली असते. आता भारताचा स्टार क्रिकेटपटू के.एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या पहिल्या एनिव्हर्सरीची चर्चा रंगली आहे. राहुल आणि अथिया यांचं लग्न जानेवारी 2023 मध्ये झालं होतं. दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाला जानेवारी महिन्यात एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण राहुल आणि अथिया यांनी खास अंदाजात लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. आता दोघांच्या पहिल्या एनिव्हर्सरीचे फोटो सोश मीडियावर लीक झाले आहे. एनिव्हर्सरीसाठी राहुल याने पत्नीसाठी खास व्यवस्था केली होती. लीक झालेल्या फोटोमध्ये राहुल याने पत्नीसाठी केलेली खास व्यवस्था चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

शेफ हर्ष दीक्षित यांनी राहुल आणि अथिया यांच्या एनिव्हर्सरीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एनिव्हर्सरीसाठी पांढऱ्या रंगाची थीम होती. टेबल पासून डीशपर्यंत सर्वकाही पांढऱ्या रंगाचं होतं. तर संपूर्ण खोलीत मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. पत्नी अथिया हिला खास वाटावं म्हणून राहुल याने खास स्पेशल आयोजन केलं होतं.

शेफ हर्ष दीक्षित फोटो पोस्ट करत म्हणाले, ‘या आठवणी मी गुपित ठेवू शकलो नाही…’ फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर देखील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिन जानेवारी 2023 मध्ये भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल   याच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी अनेक वर्ष राहुल आणि अथिया एकमेकांना डेट करत होते. लग्नाआधी दोघांना अनेक ठिकाणि स्पॉट देखील करण्यात आलं.

अथिया हिने ‘हिरो’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘हिरो’ सिनेमानंतर देखील अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पण प्रेक्षकांनी अभिनेत्रीला आणि तिच्या सिनेमांना प्रेम दिलं नाही. अथिया हिचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा