AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील शेट्टीच्या लेकीचा थाटच निराळा; अथिया हिचा लेहंगा तयार करण्यासाठी लागले इतके हजार तास

दहा वीस नाही तर, इतके हजार तासांमध्ये अथिया शेट्टी हिच्या लग्नाचा लेहंगा; कोणत्या डिझायरने तयार केला सुनील शेट्टीच्या लग्नाचा लेहंगा...

सुनील शेट्टीच्या लेकीचा थाटच निराळा; अथिया हिचा लेहंगा तयार करण्यासाठी लागले इतके हजार तास
सुनील शेट्टीच्या लेकीचा थाटच निराळा; अथिया हिचा लेहंगा तयार करण्यासाठी लागले इतके हजार तास
| Updated on: Jan 24, 2023 | 12:52 PM
Share

मुंबई : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी २३ जानेवारीच्या मुहूर्तावर लग्न केलं. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अथिया आणि राहुल यांनी गेल्या वर्षी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली. अथिया आणि राहुल खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्न सोहळ्यात क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अथियाच्या लग्नानंतर अभिनेते सुनील शेट्टी यांनी पापाराझींना मिठाई देवून आनंद साजरा केला.

सध्या सर्वत्र अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. लग्नात अथियाने पेस्टल गुलाबी रंगाचा एम्बेलिश्ड लेहंगा घातला होता. अथिया हिचा लेहंगा प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्ना हिने डिझाइन केला आहे. अथियाचा लेहंगा तयार करण्यासाठी दहा वीस नाही तर, तब्बल १० हजार तास लागले.

अथियाचा लेहंगा पूर्ण हाताने तयार करण्यात आला आहे. लेहंग्यावर जरदोजी आणि जाळी वर्कसह सिल्कचे वर्क होते. तर, ब्लाऊज आणि दुपट्टा सिल्क ऑर्गन्झाचा बनलेला होता. अथियाचा लेहंगा तयार होण्यासाठी दहा हजार तास म्हणजे ४१६ दिवस लागले. लेहंग्यामध्ये अथिया प्रचंड सुंदर दिसत होती, तर राहुल देखली नवरदेवाच्या रुपात उठावदार दिसत होता.

अथिया आणि राहुल यांच्या लग्नात इशांत शर्मा आणि वरुण आरोन यांसारख्या क्रिकेटर्ससोबतच डायना पेंटी, आकांक्षा रंजन कपूर, अंशुला कपूर, अनुपम खेर आणि कृष्णा श्रॉफ यांसोबतच अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अथिया आणि राहुल यांच्या लग्नात काही ठरावीक पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं.

Follow Us
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा