शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचा निर्माता दुसऱ्यांदा होणार बाप, पत्नीच्या बेबी बंपसोबतचा रोमँटिक फोटो तुफान व्हायरल
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा निर्माता होणार दुसऱ्यांचा बाप, पत्नीच्या बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी.

बॉलिवूडला ‘जवान’सारखा सुपरहिट चित्रपट देणारा प्रसिद्ध दिग्दर्शक एटली आणि त्याची दिग्दर्शक-अभिनेत्री पत्नी प्रिया एटली यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाची चाहूल लागली आहे. या लोकप्रिय दिग्दर्शक जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या गर्भधारणेची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली असून ही गोड बातमी चाहत्यांमध्ये वेगाने व्हायरल होत आहे.
एटलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कुटुंबीयांसोबतचे खास फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. शेअर करण्यात आलेल्या फॅमिली फोटोमध्ये एटली कुमार त्याची पत्नी प्रिया आणि 2023 मध्ये जन्मलेला त्यांचा मुलगा मीर एकत्र मस्ती करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या घरातील अनेक पाळीव प्राणीही दिसून येत आहेत. हे संपूर्ण वातावरण प्रेमळ आणि आनंदी वाटत आहे.
बेबी बंप फोटोशूटने वेधले लक्ष
या फोटो सीरिजमधील एका खास फोटोमध्ये प्रिया एटली निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आरामात बसून आपला बेबी बंप पाहताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर शांत आनंद आणि एटली कुमारचे प्रेमळ स्मितहास्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये त्यांचा मुलगा मीर आई-वडिलांसोबत खेळताना दिसतो, ज्यामुळे तो लवकरच मोठा भाऊ होणार असल्याची गोड झलक या फोटोंमधून पाहायला मिळते.
या प्रेग्नेंसी फोटोशूटमध्ये एक फोटो त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबतही काढण्यात आला आहे. शांतपणे आराम करत असलेले हे पाळीव प्राणी या कुटुंबाच्या आयुष्यातील प्रेमळ नातेसंबंध अधिक ठळकपणे दाखवत आहेत. फोटो सीरिजच्या शेवटच्या फोटोमध्ये एटली कुमारने एक खास पोस्ट लिहिली असून, त्यात पत्नी प्रिया, मुलगा मीर आणि त्यांच्या सर्व पाळीव प्राण्यांची नावे नमूद केली आहेत.
View this post on Instagram
आठ वर्षांनंतर पहिले अपत्य, आता दुसरी आनंदवार्ता
एटली कुमार आणि प्रिया यांनी लग्नानंतर जवळपास आठ वर्षांनंतर 2023 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाला, मीरला जन्म दिला होता. आता 20 जानेवारी रोजी त्यांनी दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा करत आपल्या चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.
चित्रपटसृष्टीतील हे लोकप्रिय जोडपे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या आनंदाच्या क्षणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटी मित्रांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, एटली कुमार-प्रिया यांच्यासाठी हा काळ अत्यंत खास ठरत आहे.
