‘तिने मला धोका दिला’, अभिनेत्री कंगना रनौतवर आता आणखी एक आरोप

अभिनेत्री कंगना रनौतवर आता तिसऱ्यांदा फसवल्याचा आणि चोरीचा आरोप झालाय. यावेळी तिच्यावर एका लेखकाने हा गंभीर आरोप केलाय.

'तिने मला धोका दिला', अभिनेत्री कंगना रनौतवर आता आणखी एक आरोप


मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतवर आता तिसऱ्यांदा चोरीचा आरोप झालाय. यावेळी तिच्यावर एका लेखकाने पटकथा चोरल्याचा गंभीर आरोप केलाय. Didda: The Warrior Queen Of Kashmir या पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी हा गंभीर आरोप केलाय. विशेष म्हणजे याआधी निर्माते दिग्दर्शक केतन मेहता यांनी देखील कंगना रनौतवर मणिकर्णिका चित्रपटाची संकल्पना चोरल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात त्यांनी कंगनाला नोटीसही पाठवली होती. सिमरन या चित्रपटाचे लेखक अपूर्व असरानी यांनी देखील कंगनावर जबरदस्तीने पटकथा घेतल्याचा आरोप केला होता (Author Ashish Kaul allege of Kangana Ranaut stealing story for film).

कंगना रनौतने नुकतीच ‘मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजेंड ऑफ दिद्दा’ या सिक्वल चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट काश्मीरमधील राणी दिद्दा या व्यक्तीरेखेवर अवलंबून असेल. ही राणी धाडसी आणि हुशार असल्याचं सांगितलं जातं. कंगनाने या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर प्रसिद्ध लेखक आशिष कौल यांनी कंगनावर ‘दिद्दा : द वॉरियर क्विन ऑफ काश्मीर’ या पुस्तकातून ही कथा घेतल्याचा आरोप केला आहे.

आशिष कौल म्हणाले, “मी ज्या महिलेला एक राष्ट्रवादी महिला समजत होतो तिनेच फसवणूक केल्याने मला खूप दुःख झालंय. मी एक काश्मिरी ब्राह्मण आहे आणि कंगनाने ज्या प्रकारे काश्मिरी ब्राह्ममणांच्या प्रश्नांवर भूमिका घेतली होती त्यावरुन तिला आमचं दुःख कळतंय असं वाटत होतं. काश्मिरचे लोकही तिला आदर देत होते. मात्र, तिने ज्या प्रकारे माझी कथा चोरली आणि मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला त्यावरुन आम्ही चुकीच्या माणसाला आमचा हिरो मानलं होतं.”

“संपूर्ण जगाला माहिती आहे की दिद्दाची कथा माझ्या कुटुंबाला वारसात मिळाली आहे. मी ही गोष्ट माझ्या आजीकडून ऐकली होती. त्यानंतर मी अनेक वर्ष मेहनत घेऊन केवळ पुस्तकंच लिहिलं नाही, तर फिल्म रायटर्स असोसिएशन आणि दिल्लीला जाऊन त्याचे कॉपी राईट्स घेतले. इतकं होऊनही कंगना आणि चित्रपट निर्माते कमल जैन मला खोटं ठरवत माझी कथा चोरत आहे. हे खूप वेदनादायक आहे,” असंही आशिष कौल यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

Kangana Ranaut | राजीव मसंद यांची ‘धर्मा प्रोडक्शन’मध्ये वर्णी, संतापलेल्या कंगनाची टीका!

Manikarnika Returns | ‘पंगा क्वीन’च्या नव्या चित्रपटाची घोषणा, ‘काश्मीरच्या राणी’च्या भूमिकेत दिसणार कंगना!

‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगनाविरोधात जोरदार आंदोलन, लोक म्हणाले परत जा, परत जा…!

व्हिडीओ पाहा :

Author Ashish Kaul allege of Kangana Ranaut stealing story for film

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI