‘बाहुबली’तील त्या वादग्रस्त सीनवर तमन्नाने सोडलं मौन, म्हणाली, सेक्स वाईट असेल तर…
Baahubali Controversial Scene: सेक्स वाईट असेल तर..., 'बाहुबली' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर अखेर तमन्ना भाटियाने मौन सोडलं, सध्या सर्वत्र तमन्ना भाटिया हिच्या वक्तव्याची चर्चा...

Baahubali Controversial Scene: अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली: द बिगिनिंग’ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिनेमात अभिनेता प्रभास महत्त्वाच्या भूमिकेत होता. सिनेमात प्रभास आणि तमन्ना यांच्यावर असा एका सीन शूट करण्यात आला, ज्यामुळे सर्वत्र वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावर ‘अवंतिका का रेप’ म्हणून एक आर्टिकल देखील छापण्यात आलं होतं. यावर अखेर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत वादग्रस्त परिस्थितीवर तमन्ना म्हणाली, ‘जे लोक तुम्हाला नियंत्रित करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत ते एका वेगळ्या टेक्निकचा वापर करतात आणि ती टेक्निक म्हणजे लाज आणि अपराधीपणाचील भूमिका… कारण कारण ते नेहमीच तुम्हाला असं वाटायला लावतात की तुम्ही जे काही करत आहात त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, जेव्हा तुम्हाला लाज वाटू लागते, तेव्हा अशी लोकं तुमच्यावर नियंत्रण मिळवू शकतात. ‘
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जी गोष्ट इतकी चांगली आहे, त्याच गोष्टीला आपण वाईट नजरेने पाहतो… त्या दृष्टिकोनामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला आपल्या आयुष्यातील त्या पैलूची लाज वाटली पाहिजे, आपण ते लपवलं पाहिजे, आपण त्याबद्दल बोलू नये किंवा आपण त्याबद्दल उघडपणे बोलू शकत नाही. तुम्ही काहीतरी चुकीचं करत आहात… असं लोकं भासवण्याचा प्रयत्न करत असतात. पण ही आयुष्यातील सर्वात मूलभूत गोष्ट आहे. म्हणूनच आपण आज येथे आहोत.
शारीरिक संबंधांबद्दल अभिनेत्रीने केलंय मोठं वक्तव्य…
तमन्ना म्हणाली, ‘सेक्स वाईट असेल तर आपण या जगात नसतो… आपण काहीतरी चूक केली आहे याची आपल्याला लाज वाटायला लावली जाते. आपल्या देशात त्या प्रक्रियेला लोकं तुच्छ समजतात. ज्यामुळे तुम्ही, आम्ही याठिकाणी आहोत. आपण इतके दबलेले आहोत. चित्रपटातील दिग्दर्शकाचा दृष्टिकोन लोकांना का समजत नाही हे मला समजत नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
तमन्ना भाटिया हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘व्यान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. इतर प्रोजेक्टवर देखील अभिनेत्री काम करत आहे. तमन्ना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
