AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉर्नियलनंतर आता किडनी ट्रान्सप्लांट; ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबत्तीने केला धक्कादायक खुलासा

मुंबई : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबत्ती सध्या त्याच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘राणा नायडू’ ही त्याची पहिली वेब सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत राणाने त्याच्या आरोग्याविषयी खुलासा केला. कॉर्नियल आणि किडनी ट्रान्सप्लांटविषयी तो मोकळेपणे व्यक्त झाला. राणाला […]

कॉर्नियलनंतर आता किडनी ट्रान्सप्लांट; 'बाहुबली' फेम राणा डग्गुबत्तीने केला धक्कादायक खुलासा
Rana DaggubatiImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 17, 2023 | 12:36 PM
Share

मुंबई : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबत्ती सध्या त्याच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘राणा नायडू’ ही त्याची पहिली वेब सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत राणाने त्याच्या आरोग्याविषयी खुलासा केला. कॉर्नियल आणि किडनी ट्रान्सप्लांटविषयी तो मोकळेपणे व्यक्त झाला. राणाला त्याच्या उजव्या डोळ्याने दिसत नाही. आंशिक अंधत्वाचा सामना कसा केला, याविषयीही त्याने सांगितलं.

राणाला उजव्या डोळाने दिसत नाही

“मला उजव्या डोळ्याने दिसत नाही. त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीने ऑपरेट करतो. शारीरिक समस्येमुळे बरेच लोक खचून जातात आणि जरी ते ठीक झालं तरी मनात एक जडपणा असतो, तो तसाच राहतो. माझं कॉर्नियल ट्रान्सप्लांट झालं होतं, किडनीचंही ट्रान्सप्लांट झालं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी जवळपास टर्मिनेटरच आहे. मी आता जिवंत आहे आणि मला फक्त चालत राहायचंय, असा विचार मी करायचो.”

2016 मध्ये केला होता खुलासा

राणाने 2016 मध्येही उजव्या डोळ्याने दिसत नसल्याचा खुलासा केला होता. “मला असं वाटतं की मी त्या मोजक्या लोकांपैकी एक आहे, जे कॉर्नियल ट्रान्सप्लांटबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. एका मुलाच्या आईचे डोळे गेले होते आणि त्यामुळे तो खूप दु:खी होता. त्यावेळी मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी मी त्याला माझ्या डोळ्याविषयीही सांगितलं. म्हणूनच मी वेगळ्या दृष्टीकोनातून काम करतो”, असं राणाने सांगितलं.

‘राणा नायडू’मध्ये काका – पुतण्याची जोडी

राणा नायडूच्या निमित्ताने दोन साऊथ सुपरस्टार्स पहिल्यांदाच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करत आहेत. या सीरिजची कथा मुंबईच्या पार्श्वभूमीवर असून यामध्ये राणा आणि व्यंकटेश हे पिता-पुत्राची भूमिका साकारत आहे. ‘रे डॉनोवन’ या अमेरिकी वेब सीरिजचा हा रिमेक आहे.

2020 मध्ये राणाने मिहिका बजाजसोबत लग्न केलं. या लग्नसोहळ्याला फक्त कुटुंबीय उपस्थित होते. लग्नाआधी हे दोघं एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखायचे. अखेर मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि राणा-मिहिकाने लग्नाचा निर्णय घेतला. राणाने हाऊसफुल 4, दम मारो दम, बेबी अशा हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. त्याचे वडील सुरेश बाबू हे तेलुगू चित्रपट निर्माते आणि वितरक आहेत. तर मिहिका बजाज ही हैदराबादमध्ये ‘ड्यू ड्रॉप’ या डिझाईन स्टुडिओची मालकीण आहे.

Follow Us
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर; ज्ञानेश कुमारांच्या....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?