AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bappi Lahiri Death | बॉलिवूडचा ‘डिस्को किंग’ बप्पी लाहिरी यांची ‘गोल्ड मॅन’ म्हणून कशी झाली ओळख?

ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Bappi Lahiri Death | बॉलिवूडचा 'डिस्को किंग' बप्पी लाहिरी यांची 'गोल्ड मॅन' म्हणून कशी झाली ओळख?
Bappi Lahiri
| Updated on: Feb 16, 2022 | 8:27 AM
Share

मुंबई :  ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे. ज्येष्ठ संगीतकार बापी लाहिरी यांना भारतातील गोल्ड-मॅन म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या प्रेम अमेरिकन रॉक-स्टार (Rock Star) एल्विस प्रेस्लीशी यांच्या सोबत जोडलेले आहे. भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाटेमध्ये संगीतकार बप्पी लाहिरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सोन्याचे वेड असणारा माणूस बॉलिवूडचा डिस्को किंग म्हटल्या जाणाऱ्या बप्पी दाचे खरे नाव आलोकेश लाहिरी आहे. 2014 मध्ये बप्पी दा यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. निवडणूक आयोगासमोर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी सोन्या-चांदीची माहिती दिली होती. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की बप्पी दा जाड सोनसाखळ्या घालत असले तरी त्यांच्या पत्नी चित्रानीकडे त्यांच्यापेक्षा जास्त दागिने आहेत.

बप्पी लाहिरी यांच्याकडे किती सोने आहे? 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बप्पी लाहिरी यांनी भाजपच्या तिकिटावर श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी आपल्या मालमत्तेची माहिती देताना बप्पी दा यांनी सांगितले होते की त्यांच्याकडे 754 ग्रॅम सोने आणि 4.62 किलो चांदी आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेला तपशील 2014 मधील आहे. त्या गोष्टीला जवळपास 7 वर्षे झाली आहेत. बप्पी दा यांची एकूण संपत्ती 20 कोटी आहे.

बप्पी दा इतके सोने का घालतात? बप्पी दा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी अमेरिकन पॉप स्टार एल्विस प्रेस्लीपासून खूप प्रभावित होतो. पॉपस्टार एल्विस प्रेस्लीने त्याच्या कॉन्सर्टमध्ये सोन्याची चेन घातली होती. बप्पी दा यांनी त्या मुलाखतीत सांगितले होते की, एल्विस प्रेस्लीला पाहिल्यानंतर मला वाटायचे की, जेव्हा मी एक यशस्वी व्यक्ती बनेन, तेव्हा मी स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार करेन. प्रेस्लीपासून प्रेरित होऊन, मी सोनेरी परिधान करतो आणि ते माझ्यासाठी भाग्यवान आहे. अलीकडेच त्यांनी LA मध्ये ‘दमदम मस्तकलंदर’ नावाचे एक गाणे रेकॉर्ड केले आहे, शीर्ष पॉप गायिका ज्युलिया प्राइससोबत. पुढील महिन्यात स्नूप डॉगचे गाणे येत आहे.

संबंधित बातम्या

अक्षयचा ‘रक्षाबंधन’ आणि आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ यांच्यात टक्कर, कधी रिलीज होणार दोन्ही चित्रपट?

हृतिक रोशन-सबा आझादच्या अफेअरची चर्चा, सबाचा फोटो शेअर करत हृतिकची पूर्वपत्नी सुझैन खान म्हणाली…

कोणती साडी घ्यावी हे कळत नाही?, अंकिता लोखंडेचं ‘हे’ साडी कलेक्शन बघा, तुमचं कन्फ्युजन दूर होईल…

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.