गंदी बात… रणवीर अलाहाबादियापूर्वी या सेलिब्रिटीच्या वक्तव्यानेही देशात माजला होता गदारोळ
Hardik Pandya Vulger Comment : करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये क्रिकेटर हार्दक पांड्या आला होता. त्यावेळी त्याने काही अशी विधानं केली ज्यामुळे मोठा गदारोळ माजला होता.

Hardik Pandya Vulger Comment : बोलताना नेहमी विचार करून बोलावं असे आपल्याकडे मोठी माणसं नेहमी सांगत असतात. एक विधान करिअरसाठी आणि प्रतिष्ठेसाठी किती धोकादायक, जोखमीचं ठरू शकतं हे आज कोणी समय रैना आणि रणवीर अलाहबादियाला विचारून पहा. काही दिवसांपूर्वी इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये आलेल्या रणवीरने जे विधान केलं, त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. त्यावर सोशल मीडियावर प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करत असून अनेक जण रणवीरला ट्रोलही करत आहेत. पालकांवरून जो प्रश्न विचारला तो प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीररला खूप महागात पडला आहे. मात्र त्याच्यापूर्वी आधीही एका सेलिब्रिटीने असंच एक विधान केलं होतं रणवीर प्रमाणेच आणखी एक सेलिब्रिटीही अशाच एक विधानामुळे चर्चेत आला होता. तो म्हणजे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या. त्याने केलेल्या अश्लील विधानामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला होता.
कॉफी विथ करण मध्ये काय म्हणाला होता हार्दिक पंड्या ?
हार्दिक पांड्या हा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध शोमध्ये गेला होता, त्याच्यासोबत त्याचा सहकारी क्रिकेटर केएल राहुलही होता. त्यावेळी घरातील वातावरण आणि मोकळेपणाबद्दल झालेल्या संवादादरम्यान हार्दिकने एक विधान केलं ज्याने गदारोळ माजला. त्याने जेव्हा पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले, तेव्हा त्याने घरी येऊन थेट सांगितलं होतं , आज मी करून आलो…. असं घरी सांगितल्याचं त्याने नमूद केलं. मात्र एका टॉक शोमध्ये असं विधान केल्याने त्याला बरीच टीका सहन करावी लागली होती.
सोशल मीडिया आणि टीव्हीवर एवढा गदारोळ झाला की हार्दिकला माफी देखील मागावी लागली. यानंतर बीसीसीआयने क्रिकेटपटूंना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाऊन तेथे वक्तव्य करण्याबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन्ही क्रिकेटपटूंवर बीसीसीआयने तात्पुरत निलंबनाची कारवाई केली होती. तसेच त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतही बोलावलं होतं. शोमध्ये हार्दिकच्या वक्तव्यानंतर झालेला गोंधळ पाहून शोच्या निर्मात्यांना तो भाग हटवावा लागला होता.
रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाने मागितली माफी
दरम्यान, रणवीरच्या ज्या वक्तव्यामुळे तो अडचणीत सापडला आहे, त्याबद्दल त्याने बिनशर्त माफी मागितली आहे. कॉमेडी हा माझा झोन नसून असे बोलल्याबद्दल माफी मागतो असे तो म्हणाला. या संपूर्ण गदारोळानंतर समय रैनानेही मौन सोडलं. माझा उद्देश लोकांना हसवण्याचा होता. आपण चॅनेलवरून सर्व एपिसोड हटवत असल्याचे त्याने नमूद केलं, तसेच कायदेशीर कारवाईत एजन्सींना सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्याने सांगितलं.
