AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वांत लोकप्रिय मालिका होणार बंद; मराठमोळ्या अभिनेत्रीला मोठा धक्का

'भाभीजी घर पर है' या मालिकेच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. 'भाभीजी घर पर है 2.0' हा शो लवकरच बंद होणार असल्याचं समजतंय. यामागचं कारण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत शिल्पा शिंदेची एण्ट्री झाली होती.

सर्वांत लोकप्रिय मालिका होणार बंद; मराठमोळ्या अभिनेत्रीला मोठा धक्का
Shilpa ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2026 | 10:42 AM
Share

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय कॉमेडी मालिका ‘भाभीजी घर पर हैं 2.0’चा काही महिन्यांपूर्वीच प्रीमिअर झाला होता. यामध्ये अंगुरी भाभीच्या भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेची घरवापसी झाली होती. परंतु आता शिल्पाच्या कमबॅकनंतर अवघ्या दोन महिन्यांतच ही मालिका बंद होणार असल्याचं कळतंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘भाभीजी घर पर हैं 2.0’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून ‘अँड टीव्ही’मध्ये होणाऱ्या मोठ्या बदलांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. ही वाहिनी नवीन कंटेंट बंद करण्याचा विचार करत असून ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेच्या कलाकारांना 5 एप्रिल रोजी शेवटच्या एपिसोडचं शूटिंग करण्यास सांगितलं आहे.

मे 2026 पासून अँड टीव्ही एक पेड री-रन चॅनल बनण्याची शक्यता आहे. नवीन व्यवस्थापनाकडून पदभार स्वीकारल्यानंतर हा बदल लागू होईल. या चॅनलच्या धोरणात बदल करण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत चॅनल नवीन कार्यक्रमांवर लक्ष केंद्रीत करणं थांबवणार आहे आणि फक्त जुने शोज प्रसारित करणार आहे. याचा थेट परिणाम चॅनलवरील सध्याच्या शोज आणि मालिकांवर होणार आहे. चॅनलच्या सर्वांत लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ चाललेल्या मालिकांपैकी एक ‘भाभीजी घर पर हैं’ ही मालिका आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग असून त्या सर्वांची आता निराशा होणार आहे.

चॅनलच्या या मोठ्या बदलाचा भाग म्हणून ‘भाभीजी घर पर हैं 2.0’ ही मालिका येत्या काही दिवसांत बंद होणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग 16 एप्रिल 2026 रोजी प्रसारित होण्याची शक्यता आहे. याआधी ही मालिका झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल अशी चर्चा होती. परंतु ‘भाभीजी घर पर हैं’ ही मालिका ओटीटीवर स्ट्रीम होण्याऐवजी कायमची बंद होणार आहे.

या मालिकेत अंगुरी भाभीच्या रुपात तब्बल दहा वर्षांनंतर अभिनेत्री शिल्पा शिंदेनं कमबॅक केलं होतं. यात आधी शिल्पाच अंगुरी भाभीची भूमिका साकारत होती. परंतु निर्मात्यांशी काही वाद झाल्यानंतर तिने अचानक ही मालिका सोडली होती. त्यानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेनं तिची जागा घेतली होती.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच