AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहशतवाद्यांविरोधात गिरीश महाजन बंदुक घेऊन रस्त्यावर? एकनाथ खडसेंचे सणसणीत उत्तर… पुन्हा रंगला कलगीतुरा

Eknath Khadse on Girish Mahajan: आज खानदेशातील दोन दिग्गज नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. खडसेंच्या दिल्लीवारीनंतर जळगावमध्ये राजकीय द्वंद पाहायला मिळत आहे.

दहशतवाद्यांविरोधात गिरीश महाजन बंदुक घेऊन रस्त्यावर? एकनाथ खडसेंचे सणसणीत उत्तर... पुन्हा रंगला कलगीतुरा
दहशतवाद्यांविरोधातमहाजन रस्त्यावर? एकनाथ खडसेंचे सणसणीत उत्तर
| Updated on: Jul 12, 2026 | 2:17 PM
Share

Eknath Khadse on Girish Mahajan: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावल्याने दिल्लीत गेलो. त्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला. त्यांच्या या दिल्ली वारीनंतर खानदेशमधील राजकारण ढवळून निघाले. मंत्री गिरीश महाजन आणि नंतर मंत्री गुलाबराव पाटील असा आलटूनपालटून सामना रंगला. राजकीय शब्दांना धार आली. पुन्हा जुने किस्से जिवंत झाले. जळगावकर त्याला सरावले आहेत. पण राज्यासाठी हे विषय अजूनही नवीनच आहेत. मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांविरोधात आपण रस्त्यावर उतरलो होतो असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले होते. त्याचा नाथाभाऊंनी खरपूस समाचार घेतला.

मुंबई हल्ल्यावेळी रस्त्यावर

26/11 मुंबईवरील हल्ला झाला त्यावेळी आपण रस्त्यावरच होतो .इतके लोक मारले गेले. त्यावेळी आपले रक्त सळसळत होतं.ही वास्तुस्थिती आहे. एकनाथ खडसे आणि माझे कितीही वाद असले तरी ते याविषयी खरं सांगतील, असा दावा गिरीश महाजना यांनी नाशिकमध्ये आज केला होता. त्यावर आता खडसेंनी महाजनांची जोरदार फिरकी घेतली आहे.

नाथाभाऊंचे सणसणीत उत्तर

आतंकवाद्यांना मारण्यासाठी बंदुक घेऊन रस्त्यावर उतरलो, मात्र खडसेंनी काळजीपोटी रोखलं, असे महाजन म्हणाले होते. आतंकवाद्यांना मारण्यासाठी गिरीश महाजन रस्त्यावर उतरले हे मला तरी आठवत नाही कुठली चर्चा झाली नाही त्या उलट माझी स्मृती ठीक होती. त्या कालखंडात माझी स्मृती हे ठीक असेल गिरीश महाजनांची माझी कुठलीही भेट यावेळी झाली नव्हती, अशी फिरकी खडसे यांनी घेतली.

26/11 मुंबई हल्ल्याची जी घटना घडली त्यावेळी मी नंदुरबार जिल्ह्यातील एका खेड्यात होतो. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या भेटीचा आणि आतंकवादी मारण्यासाठी रस्त्यावर उतरलो आणि खडसेंनी रोखलं किस्सा असं मी म्हटलं नाही खडसेंनी स्पष्ट केलं.

गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा

खडसे या वयात कुठेही गेले तरी फरक पडणार नाही असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या दिल्लीवारीवर काढला होता. गुलाबराव पाटील खडसे परिवारासाठी घर वापसी करताय खडसेंचा पिक्चर संपला. शोले पिक्चर 30 वर्षापासून चालतोय त्यामुळे माझं 40 वर्षापासून राजकारण सुरू आहे. गुलाबराव पाटलांना ब्रेक लागला तसा ब्रेक मला लागणार नाही. स्वभाविक आहे जो तो त्याच्या परिवारासाठी करत असतो. गुलाबराव पाटील हे विधान परिषदेवर त्यांच्या मुलाला तिकीट मागत होते. खडसेंचा पिक्चर संपला असं ते म्हणाले मात्र असे अनेक पिक्चर आहेत की ते अजूनही सुरू आहे, अशी तिखट प्रतिक्रिया खडसेंनी या सर्व घडामोडींवर दिली.

माझ्या राजकीय नेत्यांना भेटीगाठी होत आहेत या माझ्या वाढदिवसाच्या आमंत्रण देण्यासंदर्भात आणि उपस्थित राहण्या संदर्भात आहे, असे खडसे म्हणाले. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्याचा काम केला, असे कौतुकही खडसे यांनी केले आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार