‘आई बॅग भर, मी घर सोडून जाणार’, मुलाचे शब्द ऐकून भारती सिंगला आले रडू, नेमकं काय घडलं?
कॉमेडियन भारती सिंग तिच्या नवीन व्लॉगमध्ये रडताना दिसत आहे. कारण तिचा मुलगा लक्ष्य म्हणाला की मी घर सोडून जाईल. नेमकं काय घडलं?

Bharti Singh : भारती सिंग ही एक प्रसिद्ध भारतीय कॉमेडीयन कलाकार आहे, जी तिच्या कॉमेडी शो आणि सूत्रसंचालनासाठी ओळखली जाते आणि सध्या ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या विनोदी कलाकारांपैकी एक आहे.
अशातच आता भारती दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर ती खूपच आनंदात आहे. अशातच तिने तिच्या एका व्लॉगमध्ये तिचा पहिला तीन वर्षाचा मुलगा लक्ष्यने घर सोडायचे असल्याने त्याने आई भारतीला त्याचे सामान पॅक करायला सांगितले तेव्हा भारती भावूक झाली. तिला अश्रू अनावर झाले. यासोबतच लक्ष्यने यामागचे कारण देखील उघड केले.
नेमकं काय घडलं?
भारती सिंगने तिच्या नवीन व्लॉगमध्ये मोठा मुलगा अचानक त्याच्या जाण्याची घोषणा करताना दिसतो. यानंतर त्याच्या जवळ बसलेली त्याची आई भारती ही लगेच म्हणाली की, यामुळेच मला अश्रू अनावर झाले. कारण लक्ष्य म्हणाला होता की आई, मी तुला सोडून जाणार आहे. त्यानंतर लगेच जाहीर केले होते की, तो तिला सोडणार नाही आणि त्यानंतर लगेचच त्याने आईला मिठी मारली आणि तिला किस केलं.
यावर बोलताना भारतीने सांगितले की, माहिती नाही पण अचानक लक्ष्य म्हणाला की, माझी बॅग पॅक कर, मला जायचं आहे. मी तुम्हाला सोडून जाईन. त्यानंतर भारती म्हणाली की, अस नाही बोलायचं लक्ष्य. हे जर पापासमोर तू बोलला तर पापा देखील रडतील. आम्ही तुला आवडत नाही का? मग तू असा का बोलतो की मी घर सोडून जाईल. तुला आई रडते हे चांगले वाटते का? त्यानंतर भारती घाबरली होती की जेव्हा लक्ष्य म्हणाला की बॅग पॅक करा, मी घर सोडून जाईल. कुठे जाणार आहे हे पण सांगत नाही असं भारती म्हणाली.
View this post on Instagram
भारती म्हणाली काजू दुसऱ्या नंबरवर
यानंतर भारतीने लक्ष्यकडून वचन घेतले की. यानंतर तो असं काही बोलणार नाही. यावर त्याने सांगितलं की तो कुठेही जाणार नाही. तो खाली खेळण्यासाठी जाणार आहे. लवकरच परत घरी येणार आहे. यानंतर भारती हसू लागते आणि म्हणते, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. काजू पेक्षाही जास्त. काजू हा दुसऱ्या नंबरवर आहे.
