‘बिग बॉस’ स्पर्धक अभिनेत्रीच्या मनात यायचे आत्महत्येचे विचार, ‘अशा’प्रकारे केली नैराश्यावर मात!

‘बिग बॉस 14’ फेम टीव्ही अभिनेत्री जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिच्या चाहत्यांसाठी मजेदार व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच ती ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते.

‘बिग बॉस’ स्पर्धक अभिनेत्रीच्या मनात यायचे आत्महत्येचे विचार, ‘अशा’प्रकारे केली नैराश्यावर मात!
जास्मीन भसीन

मुंबई : ‘बिग बॉस 14’ फेम टीव्ही अभिनेत्री जास्मीन भसीन (Jasmin Bhasin) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिच्या चाहत्यांसाठी मजेदार व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच ती ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. नुकतीच जास्मीन भसीन ‘बिग बॉस 14’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. या घरात तिने आपल्या आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते. जास्मीन म्हणाली की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात बर्‍याच ठिकाणांहून नकार आल्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा विचार सुरू केला होता. तिला असे वाटायचे की, तिच्यात अनेक त्रुटी आहेत. या समस्येतून बाहेर येण्यासाठी जास्मीनने काय केले, याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले (Bigg Boss 14 fame Jasmin Bhasin talk about depression phase in her life).

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत जास्मीन म्हणाली की, मी बर्‍याच वर्षांपूर्वी माझ्या आयुष्याच्या या डार्क फेजमध्ये होते, जेव्हा मी मुंबईला येऊन स्ट्रगल करायला सुरुवात केली होती. माझी लढाई नेहमी माझ्याशी होती, कारण कुठेतरी माझा आत्मविश्वास कमी होत होता. मला असे वाटायचे की, माझ्यामध्येच दोष आहेत, माझ्याच दिसण्यात दोष आहेत. मी छान दिसत नाही, म्हणून मला दररोज रिजेक्शनचा सामना करावा लागतो.

नैराश्य टाळण्यासाठी अशी झाली मदत…

या नकारात्मक भावनातून बाहेर पडण्यासाठी जास्मीनला ‘सेल्फ लव्ह’ अर्थात स्वतःवरील प्रेमाने खूप मदत केली, हे स्वतः जास्मीनने उघड केले. माझ्यासाठी हे शिकण्याचा मोठा मुद्दा असा होता की, आपल्याला प्रथम ही लढाई संपवावी लागेल. आपल्याला स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारता आले पाहिजे. आपल्याला आपले दोष स्वीकारले पाहिजेत, कारण आपल्या त्रुटीच आपल्याला इतरांपेक्षा भिन्न बनवतात. अन्यथा आपण सर्वच खेळण्यांच्या दुकानात ठेवलेल्या बाहुल्यासारखे दिसू. जोपर्यंत आपल्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटतो आणि आपण हे ठरवतो की, हे आपल्याला पाहिजे आहे आणि मी ते प्राप्त करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, मी माझा 100 टक्के देईन, जेणेकरून मी प्रयत्न केला नाही असा दोष मला वाटू नये. त्या वेळी, काहीही मिळण्याच्या मार्गात आपल्याला कोणताही अडथळा येणार नाही (Bigg Boss 14 fame Jasmin Bhasin talk about depression phase in her life).

जास्मीनची कारकीर्द

जास्मीनने ‘टशन-ए-इश्क’, ‘दिल से दिल तक’, ‘नागिन’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी ‘9 या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. ‘बिग बॉस 14’नंतर, जास्मीन ‘तेरा सूट’ आणि ‘तू भी सताया जायेगा’ या दोन म्युझिक व्हिडीओमध्ये तिचा प्रियकर अली गोनीसोबत दिसली होती. या दोन्ही गाण्यांना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळालं आहे.

(Bigg Boss 14 fame Jasmin Bhasin talk about depression phase in her life)

हेही वाचा :

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवरून सोनू सूदने चीनला सुनावले खडे बोल, चीनच्या राजदूताने दिली प्रतिक्रिया…

Death Anniversary | संजयला ड्रग्जची सवय नर्गिसनी सुनील दत्तपासून लपवली गोष्ट, मृत्यूनंतर समोर आलं कारण…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI