Bigg Boss 14 | राखीवर राहुल महाजनची टिप्पणी, बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा!

यावर्षी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत.

Bigg Boss 14 | राखीवर राहुल महाजनची टिप्पणी, बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा!

मुंबई : यावर्षी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत. परंतु, हळूहळू ‘बिग बॉस 14’ने वेगाने चर्चेत येण्यास सुरुवात केली. दरम्यान, बरेच ट्विस्ट आणि मनोरंजक वळणे सध्या ‘बिग बॉस 14’मध्ये पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात आता बरेच नवीन सदस्य दाखल झाले आहेत. (Bigg Boss 14 Rakhi Sawant vs Rahul Mahajan)

त्यामुळे बिग बॉसला नवीन वळण मिळाले आहे. विकास गुप्ता आता घराचा नवीन कॅप्टन झाला आहे. सुरूवातीला अली गोनी राहुल वैद्यला कॅप्टन करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होता. मात्र, घराच्या कॅप्टनची माळ विकास गुप्ताच्या गळात पडली आहे.

अर्शी खानला बिग बॉस राहुल किंवा विकास या दोघांपैकी एकाची बॅग फेकायला सांगतात आणि ज्याची बॅग अर्शी फेकणार नाही तो घराचा कॅप्टन होणार होता. त्यावेळी अर्शीने सर्वांनाच धक्का देत राहुलची बॅग फेकली, यामुळे घराचा नवा कॅप्टन विकास गुप्ता होतो. अर्शीच्या या निर्णयानंतर राहुल आणि अली खूप नाराज होतात. अली म्हणतो की, यानंतर मी घरातील कुढल्याच सदस्यावर विश्वास ठेवणार नाही.

दुसर्‍या दिवशी सकाळी विकास गुप्ता घरातील सदस्यांना कामाचे वाटप करून देताना दिसला विकास राहुलला म्हणतो की, तु राहुल आणि राखी भांड्याचे काम करा पण राहुल म्हणतो की, मला राखीसोबत काम करायचे नाही दुसरे कोणीतरी दे, हे ऐकल्यानंतर राखी म्हणते तुला तर निक्कीसोबतच काम करायचे असेल ना…यावरून राखी आणि राहुलमध्ये जोरदार भांडणे होतात. त्यावेळी राहुल राखीला म्हणतो चीप सेलिब्रिटी आहेस तु म्हणतो.

अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

(Bigg Boss 14 Rakhi Sawant vs Rahul Mahajan)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI