Bigg Boss 14 | गायक राहुल वैद्यचा इमोशनल ड्रामा; सलमान म्हणाला, पळपुटा!

Bigg Boss 14 | गायक राहुल वैद्यचा इमोशनल ड्रामा; सलमान म्हणाला, पळपुटा!

मुंबई :बिग बॉस 14′  यावर्षी बिग बॉसच्या शोचा टीआरपी वाढत नसल्यामुळे सध्या बिग बॉसमध्ये वेगवेगळे बदल करण्यात येत आहेत. शोमध्ये एकामागून एक नवीन ट्विस्ट येत आहे. अगोदर निक्की तांबोळी, अली गोनी आणि राहुल वैद्य यांना घराबाहेर काढले गेले होते आणि आता पुन्हा एकदा तिघे शोमध्ये दाखल झाले आहेत. निक्की आणि अली अगोदरच आले आहेत तर राहुल आजच्या भागात घरात येणार आहे. (Bigg Boss 14 Salman Khan vs singer Rahul Vaidya)

कलर्सने एक प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये सलमान खान आज राहुल वैद्यला झापताना दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वी राहुल बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडला होता. सलमान खान राहुला म्हणताना दिसत आहे की तु भगोड़ा आहेस. त्यावर राहुल म्हणतो की, मी भगोड़ा नाही माझ्या आईची तब्येत खराब होती. आणि मी माझ्या घरच्यांसोबत खूप क्लाज आहे.

मला त्यांची आठवण देखील येत होती. त्यामुळे मी बाहेर आलो होतो. सलमान पुढे म्हणतो की, बिग बॉसच्या घरामध्ये राहणाऱ्या इतर सदस्यांना त्यांच्या घरच्यांची आठवण येत नाही का? असे म्हणत सलमान राहुलला सुनवताना दिसत आहे.

कविता कौशिकचा पती रोनितनं एक पोस्ट शेअर करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्याच्या या पोस्टमध्ये स्पष्टपणे कुणाचं नाव लिहिलेलं नसलं तरी ही पोस्ट अभिनव शुक्लाबद्दल लिहिली असल्याची चर्चा आहे. अभिनवमुळे कविताला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं आणि याच व्यक्तीबद्दल कवितानं फ्रेंड्स विथ बेनिफिटचीही गोष्ट बोलून दाखवली होती. आता रोनितच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अभिनव शुक्ला आणि कविता कौशिकचे फॅन्स एकमेकांमध्ये वाद घालत आहेत.

मला तुम्हाला इथं एक खरी गोष्ट सांगायची आहे. मी एका जंटलमनविषयी बोलत आहे जो सज्जन नाही. या व्यक्तीला मद्यपान करण्याची घाणेरडी सवय आहे. मद्यपान केल्यानंतर तो बर्‍याचदा रात्रीच्या वेळी कविताला मेसेज करतो आणि भेटण्याचा हट्ट करतो. त्याच्या या सवयीने त्रस्त झाल्यामुळे कविताला पोलिसांना बोलवावं लागलं’, असं ट्विट रोनितनं ट्विटरवर शेअर केलं आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

(Bigg Boss 14 Salman Khan vs singer Rahul Vaidya)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI