Bigg Boss 15 : सगळं फिक्स होतं ? तेजस्वी प्रकाश विजेता झाल्यानंतर सेलिब्रिटींना शंका, नेटकऱ्यांमध्ये अनोखी चर्चा
तेजस्वीच्या विजयावर उपस्थित होत आहेत प्रश्न !

मुंबई – मागच्या रविवारी बिग बॉस 15 (bigboss 15) विजेता तेजस्वी प्रकाश (winner Tejaswi Prakash) ठरल्याचे आपण पाहिले. परंतु हा विजेता ठरल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. तसेच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या स्पर्धेकांची चाहते नाराज झाल्याचे आपणास पाहायवयास मिळाले. सलमान होस्ट करीत असलेल्या बिग बॉसच्या शो मध्ये ज्यावेळी विजेत्याचं नाव घोषित करण्यात आलं त्यावेळी विजेत्यांच्या चाहत्यांनी संपुर्ण भारतात जल्लोष केल्याचं सोशल मीडियावर (social media) पाहायला मिळालं. तसेच तेजस्वी प्रकाशच्या नावाने सोशल मीडियावरती एक हॅशटॅग सुध्दा चालवण्यात आला. काही टोलर्संनी तिच्या विजेत्या होण्यावरती शंका उपस्थित केली आहे. आत्तापर्यंत झालेल्या बिगबॉसचे 15 शो झाले आहेत. सगळे शो वादग्रस्त ठरले आहेत. काही सेलिब्रिटींनी सुध्दा पात्र नसलेला विजेता म्हणटलं आहे.
या सेलिब्रिटींना वाटतं की तेजस्वी विजेता नव्हती ?
गौहर खान, मुनमुन दत्ता, शेफाली जरीवाला तसेच यांच्यासह अनेक कलाकारांनी तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेता नाही असं वाटतंय. प्रतिक सहजपाल हा खरंतर झालेल्या सिजनचा विजेता असून त्याला डावलण्यात आलं असल्याची चर्चा आहे. झालेल्या सीजनमध्ये तेजस्वी विनर म्हणून फिक्स करण्यात आली होती. त्यामुळे प्रतिकला डावलण्यात आलं असं काही कलाकारांना वाटतं आहे. ज्यावेळी शो सुरू होता. विजेत्या ठरल्यानंतर नागीन चित्रपटांच्या कलाकारांची नावं सुध्दा जाहीर करण्यात आली आहेत.
तेजस्वीच्या विजयावर उपस्थित होत आहेत प्रश्न !
कोई मोईच्या रिपोर्टनुसार, तेजस्वीचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा याने यावर प्रतिक्रिया दिली- “हे खूप मूर्खपणाचे आहे, मी शोमध्ये होतो आणि मला माहित आहे की, जर घरात माझ्यासमोर एकचं स्पर्धेक आहे ती म्हणजे तेजस्वी. तिला सुरूवातीपासून या शोची प्रबळ दावेदार असल्याचं मानलं गेलं आहे. या प्रवासात मी तिच्यासोबत कायम राहिलो असून माझ्यासमोर एकचं चांगला स्पर्धेक असल्याची मला जाणीव झाली होती. त्यावेळी एकटा मॅडम शोच्या आत आल्या आणि तिने तेजस्वीकडे पाहिले आणि अरे देवा तु किती सुंदर आहेस.तेव्हाचं मला हे समजलं की एकता कपूर यांच्याकडून तेजस्वीला एक रोल फायनल झाला आहे.
नेटकर्यांमध्ये अनोखी चर्चा
रविवारपासून अनेकांनी आपल्या स्पर्धेकांचं समर्थन करण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये माझा स्पर्धेक किती मजबूत होता, हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळं ही चर्चा अजून काही दिवस राहील आणि नेहमीप्रमाणे बंद होईल.
