AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 फेम शिव ठाकरे ब्रेकअपनंतर येणाऱ्या डिप्रेशनवर म्हणाला…

प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येतेच... शिव ठाकरे याने देखील केलाय ब्रेकअपचा सामना... डिप्रेशनवर मात करण्यासाठी शिव याने केलं तरी काय?

Bigg Boss 16 फेम शिव ठाकरे ब्रेकअपनंतर येणाऱ्या डिप्रेशनवर म्हणाला...
Shiv ThakareImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 28, 2023 | 1:42 PM
Share

Bigg Boss 16 fame Shiv Thakare : ब्रेकअप… प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा आपल्या सर्वात आवडत्या व्यक्तीपासून आपल्याला दूर व्हावं लागतं. दूर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील क्षणो-क्षणी त्या व्यक्तीती आठवण आपल्याला सतावत असते. त्या व्यक्तीची सतत येत असलेली आठवण, न विसरता येणाऱ्या जुन्या आठवणी… एकत्र घालवलेले क्षण सतत डोळ्यासमोर येत असतात. अशात त्या आठवणींमधून बाहेर पडणं फार कठीण होवून जातं. आपल्याला असं वाटतं, फक्त सामान्य व्यक्तींसोबत असं होतं, पण असं नसतं… ब्रेकअपनंतर सेलिब्रिटी देखील डिप्रेशनच्या जाळ्यात अडकतात. नुकताच बिग बॉस (Bigg Boss 16) फेम शिव ठाकरे (shiv thakare) याने देखील डिप्रेशनबद्दल मोठं वक्यव्य केलं आहे.

डिप्रेशनबद्दल शिव ठाकरे म्हणाला, ‘ब्रेकअपनंतर डिप्रेशनच्या जाळ्यात अडकलेले लोकं मला आवडत नव्हती. पण जेव्हा माझ्या आयुष्यात ती वेळ आली तेव्हा मला कळालं ब्रेकमुळे आपल्या जीवनावर किती परिणाम होतो. माझ्या आयुष्यात देखील अशी वेळ आली, तेव्हा मी पूर्णपणे खचलो होतो… एक महिन्यासाठी माझी प्रकृती खालावली होती..’ (shiv thakare deal with breakup)

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिव पुढे म्हणाला, ‘मी मित्रांसोबत बाहेर जायचो, पण त्यांच्यासोबत असण्याचा आनंद काय असतो, हे मी अनुभवू शकत नव्हतो. कोणती महत्त्वाची गोष्ट मागे राहिल्यासारखं सतत वाटयचं. त्यामुळे मी माझं घर सोडलं आणि नव्या उत्साहाने शो मिळवण्याचा प्रयत्न केला आणि यासर्व गोष्टीतून मी बाहेर आलो…’ असं वक्तव्य शिवने ब्रेकअपनंतर आलेल्या डिप्रेशनवर केलं आहे. (shiv thakare family)

शिव कायम त्याच्या खासगी आयुष्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी चाबहत्यांसोबत शेअर करत असतो. बिग बॉस शोमध्ये खुद्द बिग बॉसने शिवचं कौतुक केलं. त्यानंतर शिव देखील प्रचंड भावुक झाला होता. बिग बॉस १६ ची ट्रॉफी शिव ठाकरे यांच्या नावावर नोंदवली जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. पण शेवटच्या क्षणी अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान (salman khan) याने एमसी स्टॅन (Mc stan) याला विजेता म्हणून घोषित केलं.

एमसी स्टॅन विजयी ठरल्यानंतर शिवने देखील स्टॅनचं कौतुक केलं. बिग बॉसनंतर शिव दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘खतरो के खिलाडी १३’ मध्ये दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, शिव सिनेमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.