AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेसाठी अंकिता लोखंडेला किती मिळायचे पैसे? ‘बिग बॉस 17’मध्ये केला खुलासा

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली. यामध्ये अंकिताने अर्चना तर सुशांत सिंह राजपूतने मानवची भूमिका साकारली होती. या मालिकेची ऑफर मिळण्याआधी अंकिताने बराच संघर्ष केला होता. याविषयी ती बिग बॉसच्या घरात मोकळेपणे व्यक्त झाली.

'पवित्र रिश्ता' मालिकेसाठी अंकिता लोखंडेला किती मिळायचे पैसे? 'बिग बॉस 17'मध्ये केला खुलासा
Ankita LokhandeImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 31, 2023 | 4:23 PM
Share

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 | सलमान खानच्या ‘बिग बॉस 17’ या शोमध्ये दररोज नवीन ड्रामा आणि नवीन हंगामा पहायला मिळतोय. यंदाच्या सिझनमध्ये 17 स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी झाले. त्यापैकी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिची पती विकी जैन बिग बॉसच्या घरात आणि बाहेर तुफान चर्चेत आहेत. सोमवारच्या एपिसोडमध्ये अंकिता तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल व्यक्त झाली. नुकतेच तिने टीव्ही इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केली आहेत. बिग बॉसच्या घरात अंकिताने तिच्या करिअरमधील अशा दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला, जेव्हा ती आर्थिकदृष्ट्या अनेक समस्यांचा सामना करत होती. मुनव्वर फारुकीशी बोलताना अंकिताने याबद्दल सांगितलं.

“एकेकाळी माझ्याकडे खरंच पैसे नसायचे. हातात आहे त्या पैशात जेवू की ऑडिशनला जाऊ, यापैकी मला पर्याय निवडावं लागायचं. आईवडिलांकडून तरी मी किती पैसे मागणार ना? जेव्हा मला पवित्र रिश्ता या मालिकेची ऑफर मिळाली, तेव्हा मला दररोजचे 2 हजार रुपये मिळायचे. पण ज्यावेळी माझ्या अकाऊंटमध्ये 50 हजार रुपये क्रेडिट झाले, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याआधी तेवढे पैसे मी कधीच पाहिले नव्हते. त्या कठीण काळात माझ्या आईवडिलांनी माझी खूप साथ दिली. माझ्या ब्रेकअपनंतरही लोक प्रश्न करायचे की, अंकिताशी कोण लग्न करणार? पण त्यावेळीसुद्धा आई-वडील खंबीरपणे माझ्या पाठिशी होते”, असं अंकिताने सांगितलं.

एकता कपूर निर्मित ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अंकिताने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये अंकिता आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मुख्य भूमिका होत्या. मालिकेतील या दोघांची जोडी आणि त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. याच मालिकेत काम करता करता सुशांत आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.

सध्या बिग बॉसच्या घरातील अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांची जोडी चांगलीच चर्चेत आहे. अंकिता आणि विकी ही एकदम परफेक्ट जोडी आहे, असंच त्यांच्या सोशल मीडियावरून चाहत्यांना वाटायचं. मात्र त्यांच्या नात्याची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना बिग बॉसद्वारे पहायला मिळतेय. विकी सतत अंकिताचा इतरांसमोर अपमान करताना दिसतोय. या दोघांची दररोज भांडणं होत आहेत. यावरून ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खाननेही विकीची शाळा घेतली आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.