AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस 17’नंतर अंकिता लोखंडेला मोठी ऑफर; ऐतिहासिक चित्रपटात साकारणार भूमिका

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बायोपिकच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदना निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग पार पडणार आहे.

'बिग बॉस 17'नंतर अंकिता लोखंडेला मोठी ऑफर; ऐतिहासिक चित्रपटात साकारणार भूमिका
अंकिता लोखंडेच्या नव्या प्रोजेक्टची घोषणाImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 31, 2024 | 10:30 AM
Share

मुंबई : 31 डिसेंबर 2024 | ‘बिग बॉस 17’मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेला मोठी ऑफर मिळाली आहे. अंकिता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा सावरकरांच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे तोच या चित्रपटाचा दिग्दर्शकसुद्धा आहे. मंगळवारी अंकिताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. तिच्या या घोषणेनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या चित्रपटात अंकिता नेमकी कोणती भूमिका साकारणार याबद्दल अद्याप काही माहिती स्पष्ट नाही.

अंकिताने 2019 मध्ये कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये तिने झलकारी बाईची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पाच वर्षांनी ती मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ‘इतिहासाच्या अध्यायांमधून हरवलेल्या नेत्याला प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करतोय. बिग बॉस 17 संपल्यानंतर लगेचच मी या नव्या प्रवासाला सुरुवात करतेय. या प्रोजेक्टचा भाग असल्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे’, असं लिहित तिने चित्रपटाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

रणदीप हुडा हा ‘हायवे’, ‘सरबजीत’ आणि ‘सुलतान’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आधी महेश मांजरेकर करत होते. मात्र अचानक त्यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली. रणदीपने दिग्दर्शनात ढवळाढव केल्याने त्यांनी माघार घेतल्याचं एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

याविषयी ते म्हणाले, “चित्रपटाचा संपूर्ण स्क्रिप्ट तयार झाल्यानंतरही रणदीपची ढवळाढवळ सुरूच होती. रणदीपला हिटलरच्या काही गोष्टी, इंग्लंडचा राजा, इंग्लंडचे पंतप्रधान यांच्याविषयीच्या काही गोष्टी चित्रपटात अपेक्षित होत्या. याविषयी आमच्यात मतभेद निर्माण झाले. चित्रपटातील बदलांबद्दल रणदीप खूप आग्रही होता. इतकंच काय तर नंतर जेव्हा शूटिंगला सुरुवात झाली, तेव्हा तो तिथेही ढवळाढवळ करत होता. तेव्हा मला जाणवलं की, आता हा मला चित्रपट कसं बनवायचं हेसुद्धा शिकवणार का? मी माझ्या पद्धतीने चित्रपटाचं दिग्दर्शन करणार, हे रणदीपसमोर स्पष्ट केलं होतं. पण तो मला मोकळेपणे काम करू देत नसल्याचं माझ्या लक्षात आलं. मी निर्मात्यांना भेटलो आणि त्यांना याबद्दल सांगितलं. एकतर मी किंवा रणदीप या चित्रपटावर काम करू शकतो.”

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...