AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अपहरण केलं, नालासोपाऱ्यात नेलं आणि…’, ‘बिग बॉस 17’ फेम खानजादी हिचा गौप्यस्फोट

Bigg Boss 17 | मुंबईत आल्यानंतर 'बिग बॉस 17' फेम खानजादी हिच्यावर आलेला 'तो' वाईट प्रसंग... तिचं अपहरण केलं आणि..., काळीज पिळवटून टाकणारी घटना..., खुद्द खानजादी हिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा केलाय खुलासा.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खानजादी हिची चर्चा...

'अपहरण केलं, नालासोपाऱ्यात नेलं आणि...', 'बिग बॉस 17' फेम खानजादी हिचा गौप्यस्फोट
| Updated on: Mar 30, 2024 | 10:00 AM
Share

प्रसिद्ध आणि लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस 17’ तुफान चर्चेत राहिला. शो आता संपला आहे, पण तरी देखील शोमधील स्पर्धक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बिग बॉसच्या घरात फिरोझा खान म्हणजे खानजादी हिने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बिग बॉसच्या घरात खानजादी हिची अभिनेता अभिषेक कुमार याच्यासोबत असलेली केमिस्ट्री प्रत्येकाला आवडली. पण खानजादी बिग बॉसच्या फिनालेपर्यंत पोहोचू शकली नाही… पण आता खानजादी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत खानजादी हिने तिच्यासोबत घडलेल्या अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी खानजादी मायानगरीत आली. पण मुंबईत आल्यानंतर अभिनेत्री कशी वागणूक मिळाली याबद्दल अभिनेत्रीने मोठा आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना सांगितली आहे.

खानजादी म्हणाली, ‘मुंबईत आल्यानंतर आयुष्य बदलणार माहिती होतं. अनेकांनी मला सांगितलं होतं अनेक प्रवृत्तीची माणसं भेटतील. तुला भडकवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तसंच झालं… माझं अपहरण झालं… नालासोपारा येथील झोपडपट्टीत मला घेऊन गेले. त्यांनी मला जीवेमारण्याचा प्रयत्न केला. पण मी तेथून पळ काढला… मी याबद्दल जास्त काही बोलणार नाही..’

‘अनेक वाईट गोष्टी घडल्या… पण मी माझी जिद्द सोडली नाही. मी मुंबई सोडून जाणार नाही… याच एका गोष्टीवर मी ठाम होती. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझा आनंद, कुटुंब, भावना सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे. मी मुंबईत आली आहे कही तरी करुन दाखवण्यासाठी…’

पुढे खानजादी म्हणाली, ‘झगमगत्या विश्वात करियर करण्यासाठी अनेक तरुण, तरुणी घर सोडण्याचा निर्णय घेतात. पण मी त्यांना सांगेल इतकं मोठं पाऊन उचलू नका…कारण प्रवास फार कठीण आहे. प्रत्येक जण कंगना रनौत आणि खानजादी नसतो… कंगना हिने फार कमी वयात घर सोडलं… मी देखील घर सोडून आली आहे.’ असं देखील खानजादी म्हणाली.

एवढंच नाहीतर, खानजादी हिने झगमगत्या विश्वात कास्टिंग काऊचचा देखील सामना केला आहे. खानजादी म्हणाली, ‘कास्टिंग काऊच सारख्या वाईट गोष्टीचा देखील सामना केला आहे. पण मला समजून यायचं समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे… मी छोट्या शहरातून आली आहे. पण मी मुर्ख नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खानजादी हिची चर्चा रंगली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.