AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 : ईशासोबत सर्वांसमोर रोमान्स, समर्थ म्हणाला, ‘माझी गर्लफ्रेंड आहे, मी तिच्यासोबत…’

Bigg Boss 17 : 'माझी गर्लफ्रेंड आहे, मी तिच्यासोबत...', गर्लफ्रेंड ईशा मालवीय हिच्याबद्दल समर्थ याचं मोठं वक्तव्य, रोमाँटिक व्हिडीओमुळे झाला ट्रोल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त समर्थ याच्या वक्तव्याची चर्चा...

Bigg Boss 17 : ईशासोबत सर्वांसमोर रोमान्स, समर्थ म्हणाला, 'माझी गर्लफ्रेंड आहे, मी तिच्यासोबत...'
| Updated on: Jan 18, 2024 | 8:45 AM
Share

मुंबई | 18 जानेवारी 2024 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 17’ ची चर्चा रंगली आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे सतत वाद होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांच्या रोमान्सची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. दोघांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं. आता समर्थ याने ईशा हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल आणि व्हायरल व्हिडीओबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सांगायचं झालं तर, नुकताच समर्थ ‘बिग बॉस 17’ मधून बाहेर झाला आहे. शोमधून बाहेर आल्यानंतर समर्थ याने दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. ईशा हिच्याबद्दल समर्थ म्हणाला, ‘ही माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. मला नाही वाटत यामध्ये काही चुकीचं आहे. एकापेक्षा जास्त मुलींसोबत तर नाही ना मी काहीही करत…’

‘मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत होतो. मी माझ्या गर्लफ्रेंडला हग आणि किस केलं.. जर तुम्ही प्रेम करत असाल तर, हे एक माध्यम आहे असलेलं प्रेम व्यक्त करण्याचं. मी शोमध्ये आणि शोच्या बाहेर देखील रियल आहे. मी कधीही खोटं वागलो नाही…’ असं देखील समर्थ म्हणाला…

पुढे समर्थ म्हणाला, ‘एलिमिनेशन झालं त्यावर मी आनंदी नाही. कारण मला विजयी व्हायचं होतं. बिग बॉसमध्ये चांगले क्षण अनुभवले.’ एवढंच नाही तर, समर्थ याने अभिषेक याच्यासोबत झालेल्या भांडणावर देखील स्पष्टीकरण दिलं आहे. समर्थ म्हणाला, ‘माझी चुकी होती मी मान्य करतो. त्याची देखील चुकी होती. मी त्याला बोललो, माझी राग त्याच्यावर काढला कारण त्याची वागणूकच तशी होती…’

‘ईशा हिला तो वाईट म्हणाला आणि ही गोष्ट मी कधीच विसरु शकत नाही… लोकं अनेक वर्षांनंतर देखील राग विसरत नाहीत. असं असताना चार आठवड्यात मी कसं विसरु…’ असं देखील समर्थ म्हणाला… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त समर्थ याच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक