लग्न, लिपलॉक ते प्रेग्नंसी.. ‘बिग बॉस’मधील धमाकेदार ट्विस्ट पाहून प्रेक्षकही चकीत!

बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वांत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये आजपर्यंत असे अनेक ट्विस्ट पहायला मिळाले, ज्यामुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. यंदाच्या सिझनमध्येही अंकिता लोखंडेच्या प्रेग्नंसीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

लग्न, लिपलॉक ते प्रेग्नंसी.. 'बिग बॉस'मधील धमाकेदार ट्विस्ट पाहून प्रेक्षकही चकीत!
Bigg BossImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 9:51 AM

मुंबई : 18 नोव्हेंबर 2023 | सलमान खानचा ‘बिग बॉस 17’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. दररोज या शोमध्ये एक नवीन ड्रामा पहायला मिळतो. गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडेच्या प्रेग्नंसीच्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. अंकिताने पती विकी जैनसमोर हेसुद्धा सांगितलं आहे की तिने प्रेग्नंसीचे काही टेस्ट केले आहेत. त्यामुळे घरातील इतर सदस्यसुद्धा गुड न्यूजची वाट पाहत आहेत. मात्र हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे की खरंच ती गरोदर आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बिग बॉसच्या शोमध्ये अशा प्रकारचे धक्कादायक ट्विस्ट येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही लिपलॉकपासून लग्न ते प्रेग्नंसीपर्यंत अनेक धमाकेदार ट्विस्ट या शोमध्ये पाहिले गेले.

रिद्धिमा पंडित-नेहा भसीनचा लिपलॉक

बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्ये रिद्धिमा पंडित आणि नेहा भसीन यांनी चक्क लिपलॉक केला होता. एका टास्कदरम्यान या दोघींनी एकमेकांना किस केलं होतं. या घटनेनं प्रेक्षक चक्रावले होते.

हे सुद्धा वाचा

आकांक्षा पुरी आणि जद हदीदचा लिपलॉक

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये आकांक्षा पुरी आणि जद हदीद यांचा लिपलॉक तुफान चर्चेत होता. या दोघांनी बिग बॉसच्या घरात जवळपास 30 सेकंदांपर्यंत किस केलं होतं. असा रोमान्स शोमध्ये पहिल्यांदाच पहायला मिळाला होता. यामुळे आकांक्षाला शोमधून बाहेरसुद्धा पडावं लागलं होतं.

सारा खान आणि अली मर्चंटचं लग्न

‘बिग बॉस 4’मधील स्पर्धक सारा खान आणि अली मर्चंट यांनी घरातच लग्न केलं होतं. मात्र हे लग्न दोन महिनेसुद्धा टिकलं नव्हतं. घरातून बाहेर पडताच या दोघांचा घटस्फोट झाला.

गौहर खानने रचला इतिहास

अभिनेत्री गौहर खान ही बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र बिग बॉसच्या इतिहासातील ती पहिली अशी स्पर्धक होती जी मध्येच शो सोडून गेली होती. त्यानंतर तिने कमबॅक केलं आणि विजेतीसुद्धा ठरली.

मोनालिसा आणि विक्रांत सिंहचं लग्न

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आणि तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह यांनी बिग बॉसच्या दहाव्या सिझनमध्ये लग्न केलं होतं. मला नॅशनल टीव्हीवर लग्न करायचं होतं, अशी इच्छा मोनालिसाने व्यक्त केली होती. त्यामुळे बिग बॉसच्या निर्मात्यांनी तिची ही इच्छा पूर्ण केली.

जसलीन मथारुचा बिकिनी लूक व्हायरल

‘बिग बॉस 12’मध्ये जसलीन मथारु खूप चर्चेत होती. भजन सम्राट अनुप जलोटाशी तिचं रिलेशनशिप विशेष चर्चेत होतं. यासोबतच बिग बॉसच्या घरातील तिचा बिकिनी लूक चांगलाच व्हायरल झाला होता.

वाइल्ड कार्ड एण्ट्री करून जिंकली ट्रॉफी

बिग बॉसच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं होतं. एल्विश यादव या युट्यूबरने वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. मात्र तोच अखेरीस विजेता ठरला.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.