Bigg Boss 17 : युट्यूबरचा बिग बॉसवर गंभीर आरोप; म्हणाला “आम्हाला विकत घेऊन फक्त..”

गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील भांडणाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या दोघांना आणि ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट या टेलिव्हिजन कपलला अधिक महत्त्व दिल्याने अनुरागने बिग बॉसवर पक्षपात केल्याचा आरोप केला.

Bigg Boss 17 : युट्यूबरचा बिग बॉसवर गंभीर आरोप; म्हणाला आम्हाला विकत घेऊन फक्त..
Youtuber Anurag Dobhal Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 1:19 PM

मुंबई : 24 ऑक्टोबर 2023 | सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस 17’ या शोला एक आठवडा पूर्ण झाला आहे. हा शो प्रीमिअरपासूनच सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये दररोज नवीन ड्रामा आणि नवीन भांडण पहायला मिळतं. अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडीमधील भांडणांनी आधीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तर आता प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोभाल याने बिग बॉसच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शोमध्ये टीव्ही कलाकारांना प्रामुख्याने पाठिंबा दिला जात असल्याचा आरोप त्याने बिग बॉसवर केला आहे. यानंतर बिग बॉसने या युट्यूबरची चांगलीच शाळा घेतली आहे.

अनुरागचे बिग बॉसवर आरोप

“यंदाचा सिझन हा फक्त आणि फक्त टीव्हीबद्दलच आहे. युट्यूबर्स किंवा इतर कम्युनिटीबद्दल नाही. त्यांनी केवळ मनोरंजनासाठी आम्हाला विकत घेतलं आहे. आमची जिंकण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. ते आमचं नाव 17 किंवा 18 व्या क्रमांकावर घेतात. माझे आईवडील मला टीव्हीवर पाहण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत जागे असतात. या शोमध्ये पक्षपात होतोय. जर बिग बॉस टीव्ही स्टार्सना पाठिंबा देत असेल तर फक्त टीव्हीवाल्यांनाच इथे बोलवायला पाहिजे होतं. आम्हाला का घेऊन आले”, असा सवाल अनुरागने केला.

बिग बॉसने घेतली अनुरागची शाळा

अनुराग डोभालचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर बिग बॉसने त्याची शाळा घेतली. बिग बॉस अनुरागला म्हणाला, “ठीक आहे, आम्ही तुला पूर्ण वेळ देतो. सलमानच्या वीकेंड का वार या एपिसोडनंतर अनुराग सतत हेच म्हणतोय की हा शो टीव्हीवाल्यांचा आहे. टीव्ही कलाकारांना बिग बॉसकडून अधिक महत्त्व दिल्याचं म्हटलं गेलंय. मी पहिल्याच दिवशी हे स्पष्ट केलं होतं की जे लोक माझा हा शो चालवतील, त्यांच्या बाजूने नेहमीच असेन.” बिग बॉस पुढे म्हणतो की त्याला या खेळाचा 17 वर्षांचा अनुभव आहे आणि अनुरागची खेळी घरातील सर्वांच्या खेळाला उद्ध्वस्त करतेय. इतकंच नव्हे तर बिग बॉसने अनुरागला तलाव खराब करणारा मासा असंही म्हटलंय. जो मनोरंजक असतो, तो आपोआप कॅमेराचा लाडका होऊन जातो. उदास होऊन कोपऱ्यात बसल्याने फुटेज मिळणार नाही, अशाही शब्दांत बिग बॉसने अनुरागला फटकारलं आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.