Bigg Boss 19 : तान्या मित्तलच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत घडलं वाईट; मुंबई एअरपोर्टवर पोलिसांनी..
Bigg Boss 19 : इन्फ्लुएन्सर आणि व्यावसायिका तान्या मित्तल तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. एकीकडे बिग बॉसच्या घरात ती तिच्या वागणुकीमुळे चर्चेत असते. तर दुसरीकडे घराबाहेर तिच्या खासगी आयुष्याची चर्चा होत आहे.

Bigg Boss 19 : ‘बिग बॉस’ हा शो नेहमीच ड्रामाने भरलेला असतो आणि सध्याचा एकोणिसावा सिझनसुद्धा त्याला अपवाद नाही. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिझनेसवुमन तान्या मित्तल या सिझनच्या पहिल्या एपिसोडपासूनच चर्चेत आहे. एकीकडे घरातील तिच्या वागणुकीची प्रेक्षकांमध्ये चर्चा असतानाच आता दुसरीकडे तिचं खासगी आयुष्य प्रकाशझोतात आलं आहे. तान्याचा एक्स बॉयफ्रेंड बलराज सिंह नुकताच अडचणीत सापडला आहे. ‘टेली मसाला’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, बलराज सिंहला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.
बलराजला अटक करण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. परंतु त्याच्या अटकेची बातमी सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. तान्याप्रमाणेच बलराजसुद्धा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याचप्रमाणे तो उत्तर प्रदेशातील सहालपुरा गावाचा सरपंचसुद्धा आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 26 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर त्याच्या युट्यूब चॅनलचे 82 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. विविध सेलिब्रिटींच्या मुलाखती, सामाजिक आणि राजकीय विषयांवरील मतं… यासंदर्भातील कंटेंट त्याच्या युट्यूब चॅनलवर पहायला मिळतो.

Balraj Singh and Tanya Mittal
तान्या बिग बॉसच्या घरात येताच बलराज सोशल मीडियावर अधिक चर्चेत आला. यामागचं कारण म्हणजे त्याने तान्यावर बरेच आरोप केले आहेत. तान्या तिच्या श्रीमंतीबद्दल आणि आलिशान लाइफस्टाइलबद्दल खोटं बोलत असल्याचं त्याने म्हटलं होतं. माझ्या अवतीभवती 150 बॉडीगार्ड्स असतात, मी फक्त चांदीच्या भांड्यातूनच पाणी पिते, माझं घर सेव्हन-स्टार हॉटेलपेक्षाही आलिशान आहे.. असे दावे तान्याने बिग बॉसच्या घरात केले होते. परंतु हे सर्व दावे खोटे असल्याचं बलराजने म्हटलं होतं.
बलराजने जेव्हा तान्याच्या टीमला कायदेशीर नोटीस बजावली, तेव्हा हे प्रकरण आणखीनच चर्चेत आलं. तान्याने माझे फोटो आणि व्हिडीओ माझ्याच परवानगीशीविया सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्यावर रोमँटिक गाणी लावली.. असा आरोप बलराजने केला होता. यामुळे लोकांमध्ये रिलेशनशिपबाबत गैरसमज निर्माण झाल्याचं त्याने म्हटलं होतं. याविरोधात मी तान्यावर मानहानीचा खटला दाखल करू शकतो, परंतु मी सध्या फक्त नोटीस बजावण्याचा मार्ग निवडला आहे, असाही खुलासा बलराजने केला होता.
