प्रीमियरपूर्वीच बदलला खेळ; यावेळी बिग बॉस 19 च्या घरात चाहते अन् स्पर्धक मीस करणार ही गोष्ट
आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती बिग बॉस 19 ची. पण या सीझनमध्ये एक गोष्ट अशी आहे जी चाहते आणि स्पर्धक दोन्हीही मिस करणार आहेत. कोणती आहे ती गोष्ट जाणून घेऊयात.

आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती बिग बॉस 19 ची. यावेळी बिग बॉसमध्ये नवीन काय पाहायला मिळणार आहे याबाबत स्पर्धकांना नक्कीच उत्सुकता आहे. तसेच बिग बॉसची थीम काय असणार आहे याबाबत देखील चाहत्यांना आतुरता आहे. तसेच घोषणा झाल्यापासून लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 19’ बद्दलदररोज काहीना काही नवीन अपडेट येत आहे. तसेच शोमध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत अनेक नावे समोर आली आहेत. इतकेच नाही तर अनेक स्टार्सची नावे देखील निश्चित करण्यात आली आहेत.
बॉसबद्दलची आणखी एक नवीन अपडेट समोर
दरम्यान, आता ‘बिग बॉस 19’ बद्दल एक नवीन बातमी समोर येत आहे. यावेळी शोमध्ये मोठा बदल होणार आहे. यासोबतच, मीडियाला बिग बॉसमध्ये कधी एन्ट्री मिळणार आहे त्याची तारीखही आता समोर आली आहे. पण बिग बॉसबद्दलची आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात एक गोष्ट मिसिंग असणार आहेत. जी प्रत्येक सीझनमध्ये होती. ती काय गोष्ट आहे जाणून घेऊयात.
‘बिग बॉस 19’ च्या घरात ही गोष्ट नसणार
बिग बॉसशी संबंधित अपडेट्स देणाऱ्या Biggboss.tazakhabar ने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की यावेळी ‘बिग बॉस 19’ च्या घरात तुरुंग नसणार आहे. जवळपास प्रत्येक सीझनमध्ये घरात एक मोठा तुरुंग बनवण्यात येतो. ज्यामध्ये स्पर्धकांना बराच काळ ठेवण्यात येते. एखाद्या स्पर्धकाकडून जर मोठी चूक झाली किंवा नियम मोडला गेला तर त्याला या तुरुंगात बंद केलं जातं. परंतु यावेळी तसं होणार नाहीये. यावेळी घरात तुरुंगच नसणार आहे. स्पर्धकांना तुरुंगाच्या शिक्षेपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे.
स्पर्धक आणि चाहते करणार ही गोष्ट मिस करणार
कुठेतरी ही गोष्ट स्पर्धकही मिस करणार आहेत आणि चाहतेही. कारण जरी स्पर्धकांना तुरुंगात शिक्षा म्हणून ठेवलं जातं असलं तरी देखील तिथेही स्पर्धकांची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळायची. तिथेही बरेच असे किस्से घडायचे. पण आता हे सर्वच नसणार आहे. मग तुरुंगाऐवजी आता काय नवीन ट्वीस्ट असणार आहे याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.
घरात मीडियाला कधी प्रवेश मिळणार?
दरम्यान या पोस्टमध्ये मीडियाच्या प्रवेशाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या पोस्टमध्ये ‘बिग बॉस 19’ च्या घरात मीडिया कधी प्रवेश करेल हे सांगण्यात आले आहे. मीडिया 19 ऑगस्ट रोजी ‘बिग बॉस 19’ च्या घरात प्रवेश करणार आहे. तसेच शोचा प्रीमियर हा 24 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
