AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 : आतापर्यंतचा सर्वांत फ्लॉप सिझन? का होतेय अशी चर्चा?

'बिग बॉस'चा एकोणिसावा सिझन आजपासून (24 ऑगस्ट) कलर्स टीव्हीवर सुरू होतोय. यंदाच्या सिझनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. परंतु त्याचा निर्मात्यांना फायदा होणार की नुकसान, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Bigg Boss 19 : आतापर्यंतचा सर्वांत फ्लॉप सिझन? का होतेय अशी चर्चा?
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 24, 2025 | 3:15 PM
Share

टेलिव्हिजनवरील सर्वांत मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा 19 वा सिझन आजपासून (रविवार) प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यंदाचा सिझन बऱ्याच अवधीनंतर सुरू होतेय. परंतु त्या हिशोबाने निर्मात्यांनी त्यात बरेच बदल केले आहेत. हा नविन सिझन अत्यंत खास बनवण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे. ओटीटी आणि टीव्हीवर प्रसारित होणारा हा शो अनेक प्रकारे वेगळा असेल. परंतु नविन प्रयोग करणं आणि त्याला पहिल्यापेक्षा वेगळं बनवण्याचा प्रयत्न करणं निर्मात्यांना महागात पडू शकतो का, असा प्रश्न विचारला जात आहे.

‘बिग बॉस 19’ फ्लॉप होणार?

सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस’ या शोसंदर्भातील बातम्या देणाऱ्या ‘द खबरी’ या एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलंय, ‘सर्वसामान्य लोकांचा हा सिझन असल्याचं दिसतंय. कारण स्पर्धक कोणतेच ओळखीचे दिसत नाहीयेत. हा आतापर्यंतचा सर्वांत फ्लॉप सिझन असेल.’ असा अंदाज वर्तवत या पोस्टमध्ये बिग बॉसच्या आतापर्यंतच्या हिट सिझन्सचा एक रिपोर्टसुद्धा दिला आहे.

बिग बॉसचे ब्लॉकबस्टर सिझन्स-

बिग बॉस 4 बिग बॉस 7 बिग बॉस 11 बिग बॉस 13 बिग बॉस 16

बिग बॉसचे सुपरहिट आणि हिट सिझन्स-

बिग बॉस 3 बिग बॉस 5 बिग बॉस 6 बिग बॉस 8 बिग बॉस 10 बिग बॉस 14 बिग बॉस 17

जेमतेम चाललेले बिग बॉसचे सिझन्स-

बिग बॉस 1 बिग बॉस 2 बिग बॉस 18

बिग बॉसचे फ्लॉप झालेले सिझन्स-

बिग बॉस 9 बिग बॉस 12 बिग बॉस 15

बिग बॉस 19 मध्ये यंदा सेलिब्रिटींपासून इन्फ्लुएन्सर्सपर्यंत अनेकांचा सहभाग असणार आहे. यामध्ये गौरव खन्ना, मृदुल तिवारी, अमाल मलिक, आवेज दरबार, तान्या मित्तल, अतुल किशन, कुनिका सदानंद, प्रणित मोरे, नीलम गिरी, जीशान कादरी, बसीर अली, नेहल चुजासमा, अभिषेक बजाज, नगमा मिराजकर, अशनूर कौर आणि नतालिया जानोसजेक यांचा समावेश असेल. परंतु यापैकी बरीच नावं आणि चेहरे प्रेक्षकांना माहीत नसल्याने हा सिझन फ्लॉप होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. बिग बॉस खबरीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडूनही विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी अशा स्पर्धकांची यादीच जोडली आहे, ज्यांनी सर्वसामान्य असून बिग बॉसचे सिझन्स गाजवले आहेत. मनू पंजाबी, मनवीर गुज्जर, असिम रियाज, अर्शी खान, सपना चौधरी, निक्की तांबोळी, शहनाज गिल यांनी बिग बॉस गाजवल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.