AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी कसं वागावं हे मला शिकवू नका..”; कोणावर भडकली ऐश्वर्या?

लॉकडाऊनच्या काळात या दोघांनी लग्न केलं आणि लग्नाच्या सहा महिन्यांनंतर ते बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात असतानाही ऐश्वर्याला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं होतं. स्टार प्लसच्या लोकप्रिय 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत ऐश्वर्याची नील भट्टशी भेट झाली होती

मी कसं वागावं हे मला शिकवू नका..; कोणावर भडकली ऐश्वर्या?
Aishwarya SharmaImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2024 | 1:32 PM
Share

‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेतून अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा घराघरात पोहोचली. त्यानंतर ‘बिग बॉस’मध्ये तिने पती नील भट्टसोबत भाग घेतला. ऐश्वर्या तिच्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखते. मात्र याच बिनधास्त स्वभावामुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. या ट्रोलिंगला वैतागून आता तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने तिच्या टीकाकारांना सुनावलं आहे. तुम्ही माझी बिलं भरत नाही, असं थेट तिने ट्रोलर्सना म्हटलंय.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या म्हणतेय, “मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सत्य हे आहे की सर्वांनाच बनावट आणि खोटे लोक खूप आवडतात. जे लोक तोंडावर खरं बोलतात, ते लोकांना वाईट वाटतात. मीसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. मी सरळ तोंडावर खरं बोलते आणि त्यामुळेच लोकांमध्ये मी वाईट ठरते. आज मी पुन्हा एकदा मी स्पष्टपणे तुमच्यासमोर बोलणार आहे आणि तुम्हाला माझी ही गोष्ट ऐकावीच लागेल. तुम्हा सर्वांना माझ्या आयुष्यावर नियंत्रण मिळवायचं आहे. मला काय करायला पाहिजे आणि काय नाही, याबद्दल ज्ञान देणारे बरेच मेसेज तुम्ही मला पाठवत असता. मला कोणासोबत कसं बोलायला पाहिजे, कोणाशी कसं नाही बोलायला पाहिजे, याची शिकवण तुम्ही देत असता.”

“ओ हॅलो.. मी तुम्हा सर्वांच्या या गोष्टी अजिबात ऐकणार नाही. तुम्ही माझी बिलं भरत नाही. जरी तुम्ही माझी बिलं भरत असता तरी मी अशा चुकीच्या गोष्टी ऐकून घेतल्या नसत्या. मीसुद्धा तुमच्यासारखी वागू लागले तर मीसुद्धा ट्रोलर बनणार. मग तुमच्यात आणि माझ्यात काही फरक राहणार नाही”, अशा शब्दांत तिने टीकाकारांना सुनावलं आहे. ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत ऐश्वर्याने पुढे म्हटलंय की, “तुमच्याप्रमाणे मी माझ्या प्रोफाइलवरून डीपी काढून किंवा कोणतंही फेक सोशल मीडिया प्रोफाइल बनवून कोणालाही सोशल मीडियावर शिव्या देणार नाही. मी जशी आहे तसंच मला राहू द्या. मी तुम्हाला बदलायला सांगत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा मला बदलण्याचा प्रयत्न करू नका.”

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.