अंकिता वालावलकर हिच्यावर भडकले सूरज चव्हाणचे चाहते, बिग बॉसच्या घरात सूरजसोबत हैराण करणारा प्रकार आणि…
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सुरूवातीपासूनच चाहत्यांमध्ये या सीजनबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. आता फिनालेसाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. फिनाले वीक सुरू असतानाच बिग बॉसच्या घरात जोरदार भांडणे देखील बघायला मिळत आहेत.
बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात मोठा धमाका होताना दिसतोय. विशेष म्हणजे हे सीजन चांगली कामगिरी करताना दिसतंय. आता बिग बॉस मराठी सीजन पाचच्या फिनालेसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 6 ऑक्टोबर 2024 रोजी बिग बॉस मराठीचा फिनाले होणार आहे. आता फिनाले वीकला देखील सुरूवात झालीये. बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामे बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे घरातील शिल्लक असलेले सर्वच सदस्य हे धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत. बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता कोण होणार हे अवघ्या काही दिवसांमध्येच आता स्पष्ट होईल. त्यापूर्वीच घरात जोरदार भांडणे बघायला मिळत आहेत.
अंकिता वालावलकर ही गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील चर्चेत असलेली सदस्य आहे. मात्र, सूरज चव्हाणचे चाहते सध्या अंकिता वालावलकर हिच्यावर चांगलेच भडकल्याचे बघायला मिळत आहेत. अंकिता वालावलकर हिने यापूर्वीच बऱ्याच वेळा सूरज चव्हाण याला घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेशनमध्ये टाकले आहे. सतत अंकिता वालावलकरच्या निशाण्यावर सूरज दिसतो.
छोट्या छोट्या गोष्टींमध्येही अंकिता वालावलकर ही सूरज चव्हाण याला सुनावताना दिसते. आता नुकताच घरात एक मोठा किस्सा झाला. सूरज चव्हाण खात असताना त्याच्या प्लेटमधील अन्न डाईनिंग टेबलवर थोडे पडले. यावेळी अंकिता वालावलकर ही अत्यंत रागाने सूरजला म्हणते की, खुर्चीवर पण सांडले? काय हे सूरज..ज्यावेळी अंकिता हे सूरजला बोलत होती त्यावेळी सूरज हा टेबल साफच करत होता.
अंकिता वालावलकर ही अत्यंत रागात बोलताना दिसली. अंकिताचे अशाप्रकारे बोलणे सूरजला अजिबात पटले नाही. हेच नाही तर सूरजला अशाप्रकारे बोलणे चुकीचे असल्याचे म्हणताना निकी तांबोळी ही दिसली. निकी तांबोळी अंकिता वालावलकर हिला म्हणाली की, जेवताना थोडेफार सांडते इतक्या रागात तू सूरजला नको बोलू…तू किती जास्त वाईट प्रकारे त्याला बोलत आहे.
यावर अंकिता वालावलकर ही म्हणाली की, मी जस्ट त्याला सांगत आहे तू नको बोलू…यावरून काही वेळ अंकिता वालावलकर आणि निकी तांबोळीमध्ये वाद झाल्याचे देखील बघायला मिळाले. अंकिता वालावलकर ही ज्याप्रकारे सूरजला बोलली ते त्याच्या चाहत्यांना अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरूनच आता सूरज चव्हाण याचे चाहते हे अंकिताला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. अंकिताला जोरदार ट्रोल केले जात आहे.