AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस मराठी 5’ने तोडले आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड; छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य!

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. हा शो सुरू होऊन चार आठवडे उलटले आहेत आणि रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळतेय. भाऊचा धक्का एपिसोडला रेकॉर्ड ब्रेक टीआरपी मिळाली आहे.

'बिग बॉस मराठी 5'ने तोडले आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड; छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य!
रितेश देशमुखImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 23, 2024 | 8:02 AM
Share

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन नव्या ढंगात आणि नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचा मंच अभिनेता रितेश देशमुखने दणाणून सोडला आहे. नव्या सिझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टी सिझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरत आहेत. ग्रँड प्रीमियरपासून सुरू झालेली ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. तरुणाई, महिलावर्ग ते आबाल वृद्ध अशा सर्वांनाच ‘बिग बॉस मराठी’ने वेड लावलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ची आणि रितेशच्या कमाल होस्टिंगची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत.

‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिॲलिटी शोच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला 3.7 रेटिंग मिळालं आहे. रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला 4.0 रेटिंग मिळालं आहे. एकंदरीतच ‘भाऊच्या धक्क्याला’ 3.9 एव्हरेज रेटिंग मिळालं आहे. ‘बिग बॉस मराठी’ने संपूर्ण आठवडा गाजवला आहे. खरंतर ‘बिग बॉस मराठी’ने स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत ‘बिग बॉस मराठी’ने इतिहास रचला आहे. जुलै महिन्यात ‘बिग बॉस मराठी’चं बिगुल वाजलं आणि नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील घराघरांत रात्री नऊच्या ठोक्याला ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन पाहिला जातोय. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’बद्दल चर्चा होताना दिसून येत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सदस्यांना ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खऱ्या अर्थाने कळला आहे. आता घरातील सदस्यांची समीकरणेदेखील बदलत आहेत. त्यामुळे या नव्या सिझनची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चार सिझन्सचं सूत्रसंचालन निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी केलं होतं. यंदाच्या सिझनसाठी पहिल्यांदाच रितेशची निवड झाली आहे. रितेशला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकेल का, असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला जात होता. मात्र टीआरपीच्या या रेकॉर्डने त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.