AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांच्यामुळे मी माझं बाळ गमावलं..; थलपती विजय यांच्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केला आहे. त्यांच्यामुळेच मी माझं बाळ गमावलं, असा आरोप संबंधित अभिनेत्रीने पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी तिने किडणी घोटाळ्याचाही उल्लेख केला आहे.

त्यांच्यामुळे मी माझं बाळ गमावलं..; थलपती विजय यांच्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?
Thalapathy VijayImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2026 | 11:31 AM
Share

2017 मध्ये जलीकट्टू आंदोलनादरम्यान प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री आणि माजी नर्स ज्युली उर्फ मारी ज्युलियाना हिने चेन्नईमध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ट्रोलिंग आणि चारित्र्यहननचा आरोप करत तिने ही तक्रार केली आहे. ‘बिग बॉस तमिळ’मध्ये भाग घेतलेल्या ज्युलीने खुलासा केला की, अभिनेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या चाहत्यांकडून आणि त्यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (टीव्हीके) या पक्षाच्या समर्थकांकडून झालेल्या ट्रोलिंगमुळे तिचा गर्भपात झाला. सोशल मीडियावरील ट्रोलिंगविरोधात तिने मार्च महिन्यात पोलिसांकडे धाव घेत आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली.

याविषयी ज्युली म्हणाली, “त्यांनी माझ्याविरोधात परफेक्ट कथा, स्क्रीनप्ले, दिग्दर्शन तयार केलं आहे. माझ्याविरोधात 15 लाख रुपयांचा किडनी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. यामागे टीव्हीकेच्या एका समर्थकाचा आणि एका वकिलाचा हात आहे. मी माझं बाळ गमावलं. माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि आम्ही आमचं पहिलं मूल गमावलं. सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे झालेल्या तीव्र मानसिक त्रासामुळेच माझ्या बाळाचा मृत्यू झाला. सहानुभूती मिळवण्यासाठी मी याचा वापर करू शकते, पण माझा मुद्दा हा आहे की माझ्या आणि माझ्या पतीविरोधात अपमानजनक टिप्पण्या केल्या जात आहेत. फक्त एक स्त्री टीव्हीकेबद्दल बोलतेय म्हणून तुम्ही कोणताही विवेक न बाळगता तिचं नाव खराब करता. मला काहीच बोलायचं नाहीये.”

अभिनेत्रीचा व्हिडीओ-

“लोक म्हणतात की विजय अण्णा इन्स्टाग्राममुळे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या लोकांविरुद्ध बोलणाऱ्यांवर हल्ले घडवून आणण्याऐवजी त्यांनी जनतेसाठी काम करण्यावर लक्ष केंद्रीत करायला नको का? माझ्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिलं जात नाहीये, कारण मी ज्यांच्यावर आरोप केले आहेत, ते आठही जण टीव्हीकेचे समर्थक आहेत. माझ्या गर्भपाताला विजय अण्णा जबाबदार आहेत”, असं ती पत्रकार परिषदेत भावूक होऊन म्हणाली. याविषयी पुढे ती म्हणाली, “त्यांनी हे थेट केलं नसेलही. पण जर त्यांनी एक शब्द जरी बोलून समर्थकांना मागे हटायला सांगितलं असतं तर मी आज जे गमावलं आहे, ते गमावलं नसतं.”

ज्युलीच्या या आरोपांवर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अंबिका यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘ज्युली, तुझ्या गर्भपाताबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. पण तुझं वक्तव्य? ते खूप अनैतिक आहे. तुझी तब्येत बिघडल्यास त्याला मुख्यमंत्री कसे कारणीभूत असू शकतात? असं बोलणंच खूप वाईट आहे. तू खूप उद्धटपणे वागलीस आणि अत्यंत वाईट भाषा वापरली आहेस. आपले मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान, मग ते 20 वर्षांचे असो किंवा 99 वर्षांचे.. आपण त्यांच्या पदाचा आदर केलाच पाहिजे.’

Follow Us
भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार?
भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार?.
कोकणच्या जागेवर तटकरेंचा डंका! अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार?
कोकणच्या जागेवर तटकरेंचा डंका! अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार?.
सुप्रिया सुळे यांच्या व्याहींसह भाजपचे 11 उमेदवार जाहीर; नवे चेहरे कोण
सुप्रिया सुळे यांच्या व्याहींसह भाजपचे 11 उमेदवार जाहीर; नवे चेहरे कोण.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचा थरार! कंटेनर-ट्रकची भीषण धडक....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचा थरार! कंटेनर-ट्रकची भीषण धडक.....
जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू
जायकवाडी धरणात दुर्दैवी दुर्घटना; पाण्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू.
महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री
महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री.
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.