AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone Birthday | कमाईत प्रियांका-कटरिनाही मागे, दीपिकाचं मानधन ऐकून थक्क व्हाल

गेल्यावर्षी दीपिकाचं नाव ड्रग्ज प्रकरणात आलं होतं. मात्र, त्याचा काहीही परिणाम तिच्या एंडोर्समेंटवर झालेला नाही.

Deepika Padukone Birthday | कमाईत प्रियांका-कटरिनाही मागे, दीपिकाचं मानधन ऐकून थक्क व्हाल
दीपिका पदुकोण - माजी बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी दीपिका पदुकोणने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक स्टिरिओटाइप ब्रेक केले आहेत. आज ती चित्रपटासाठी एखाद्या पुरुष अभिनेत्यापेक्षा जास्त पैसे आकारते. तिनं इंडस्ट्रीत महिलांच्या भूमिकेची नव्यानं व्याख्या केली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 53.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
| Updated on: Jan 05, 2021 | 10:33 AM
Share

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे (Deepika Padukone Highest Paid Actress In Bollywood). आज दीपिकाचा 35 वा वाढदिवस आहे (Deepika Padukone Birthday). तिने ‘ओम शांति ओम’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर दीपिकाने कधीही मागे वळून पाहिलं नाही (Deepika Padukone Highest Paid Actress In Bollywood).

दीपिकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण, त्याचा काहीही परिणाम तिने तिच्या करियरवर होऊ दिला नाही. त्यामुळेच ती सध्याची सर्वाधिक कमाई करणारी बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.

गेल्यावर्षी दीपिकाचं नाव ड्रग्ज प्रकरणात आलं होतं. मात्र, त्याचा काहीही परिणाम तिच्या एंडोर्समेंटवर झालेला नाही. दीपिका सिनेमांमधून तर पैसे कमावतेच ,पण तिची ब्रँड व्हॅल्युही सर्वाधिक आहे. याबाबतीत तिने अनेक बड्या अभिनेत्रींना मागे सोडलं आहे.

ब्रँड एंडोर्समेंट

बिझनेस पोर्टल सीए नॉलेजनुसार, दीपिकाच्या कमाईत ब्रँड एंडोर्समेंटची महत्त्वाची भूमिका आहे. दीपिका एका जाहिरातीसाठी तब्बल 8 कोटी रुपये घेते. गेल्या तीन वर्षांमध्ये तिच्या ब्रँड एंडोर्समेंटच्या कमाईत 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. दीपिकाची नेटवर्थ जवळपास 103 कोटी रुपये आहे. ती लॉयड इंडियासाठी पती रणवीर सिंहसोबत जाहिरात करते. तसेच, ती टेटली ग्रीनची ब्रँड एंबेसेडर ही आहे.

ती नेस्ले फ्रूट व्हिला, रिलायन्स जियो, लॉरिअल, अ‍ॅक्सिस बँकेसह अनेक मोठ्या कंपन्यांचं प्रमोशन करते. जॅगुवार लाइटिंग, ओपो, तनिष्क सारख्या मोठ्या ब्रँडकडूनही ती बक्कळ पैसा कमावते.

दीपिकाच्या ब्रँड एंडोर्समेंटची यादी खूप मोठी आहे. दीपिका पादुकोण नेसकॅफे, लक्स, केलॉग्स, ब्रिटानिया, विस्तारा एअरलाईन्स, जिलेट, गोआईबीबो सारख्या मोठ्या कंपन्यांची जाहिरात करते. दीपिकाकडे इतके ब्रँड्स असल्यानेही ती लोकप्रिय असल्याचं जानकार सांगतात (Deepika Padukone Highest Paid Actress In Bollywood).

सिनेमांमधून दीपिका किती कमावते?

फ्री प्रेस जर्नलनुसार, दीपिकाने ‘पद्मावत’ सिनेमासाठी 13 कोटी रुपये घेतले होते. सिनेमांच्या बाबतीत दीपिका या काळात सर्वाधिक पैसे घेणारी अभिनेत्री आहे. दीपिका एका सिनेमासाठी 13 ते 15 कोटी रुपये घेते. दीपिकाने याबाबतीत सर्व बड्या अभिनेत्रींना मागे सोडलं आहे. कंगना राणावत, प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा यासर्वांपेक्षा जास्त मानधन दीपिका घेते.

Deepika Padukone Highest Paid Actress In Bollywood

संबंधित बातम्या :

Drugs Case | आधी चौकशी, मग अटक, ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून टॉलिवूड अभिनेत्रीवर कारवाई

NCB कार्यालयात हजेरी लावून रिया चक्रवर्ती परतली, कोर्टाच्या ‘त्या’ आदेशाचं रिया-शौविककडून पालन

New Entry | नव्या वर्षात धमाका करायला ‘दीपिका पादुकोण’ तयार, या चित्रपटातून येऊ शकते प्रेक्षकांच्या भेटीला!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.