AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणबीरच्या प्रेमात असलेल्या Deepika ला रणवीरने कसे पटवले? वाचा Birthday Special

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज 35 वा वाढदिवस आहे.

रणबीरच्या प्रेमात असलेल्या Deepika ला रणवीरने कसे पटवले? वाचा Birthday Special
| Updated on: Jan 05, 2021 | 7:48 AM
Share

मुंबई : दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधली एक यशस्वी अभिनेत्री आहे. आज (5 जानेवारी) दीपिका तिचा 35 वा वाढदिवस साजरा करतेय. कोट्यवधी हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या दीपिकाचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगनमध्ये झाला होता. तिचे वडील प्रकाश पादुकोण बॅडमिंटनटू होते. तर तिची बहीण अनिषा एक गोलकिपर आहे. (Deepika Padukone Celebrating 35th birthday)

दीपिकाने तिच्या कारकीर्दीची सुरुवात मॉडेलिंगद्वारे केली होती. दीपिकाने तिची अभिनय कारकीर्द 2007 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘ओम शांति ओम’ याद्वारे केली होती. दीपिका तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला तिच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल सांगणार आहोत. ((Deepika Birthaday Special: Know the love life of ranveer and Deepika)

दीपिकाने 2018 मध्ये इटलीच्या मोकामा लेक येथे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले. रणवीर अनेक वेळा माध्यमांच्या समोर, स्क्रीनवर दीपिकावरील त्याचं प्रेम व्यक्त करताना दिसला आहे. राजस्थानमधील रणथंभोर पॅलेसमध्ये दीपिका आणि रणवीरने नवीन वर्षाचे स्वागत केले. दीपवीरची ही जोडी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लाडक्या जोडप्यांमध्ये मोजली जाते.

रणवीर आणि दीपिकाने ‘रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. रामलीलाच्या सेटवर रणवीर आणि दीपिकाची जवळीक वाढली होती. दोघांनी रामलीलाच्या सेटवरच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. या चित्रपटात दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. त्यानंतर दोघांच्या लिंकअपची बातमी पुढे येऊ लागली.

दीपिकाला लिली खूप आवडते

रणवीरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, दीपिकाला सहा महिने डेट केल्यानंतरच तिला लग्नाबाबत विचारलं होतं. रणवीर म्हणाला की, दीपिकाला लिली (Lily Flower) खूप आवडते. दीपिकासाठी फुले खरेदी करण्यासाठी माझे खूप पैसे खर्च झाले आहेत. दीपिकापेक्षा चांगली जोडीदार मला मिळाली नसती. दीपिकामुळेच माझं करिअर इतकं यशस्वी झालं आहे.

…म्हणून लिव्ह इन.. मध्ये राहिलो नाही : रणवीर

रणवीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, अनेक वर्षे डेट करुनही दीपिकाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे नव्हते. कारण दीपिकाला नेहमीच परंपरा पाळायची होती. तिचा लग्नावर विश्वास होता आणि आहे. म्हणून ती कधीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला तयार नव्हती.

संबंधित बातम्या

New Entry | नव्या वर्षात धमाका करायला ‘दीपिका पादुकोण’ तयार, या चित्रपटातून येऊ शकते प्रेक्षकांच्या भेटीला!

Weekend Spl | दीपिका-आलियाने रणथंभोरच्या सुट्टीचा प्लॅन केला? की हा योगायोगच होता?

(Deepika Birthaday Special: Know the love life of ranveer and Deepika)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.