AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शारीरिक संबंधांशिवाय महिलांना यश मिळवणं अशक्यच,आणि…; भाजप महिला खासदाराच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ

महिलांच्या प्रगतीबद्दल आणि शरीरिक संबंधांबद्दल भाजपच्या महिला खासदाराने मोठं वक्तव्य केलं आहे. महिलेला कोणत्याही क्षेत्रात यश मिळाल्यानंतर तिने नक्कीच कोणासोबत तरी तडजोड केली असेल...यावर महिला खासदारांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.

शारीरिक संबंधांशिवाय महिलांना यश मिळवणं अशक्यच,आणि...; भाजप महिला खासदाराच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ
| Updated on: Jun 21, 2026 | 1:25 PM
Share

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणौत कायम स्वतः परखड मत मांडताना मागे -पुढे पाहत नाहीत. बिनधास्त वादग्रस्त मुद्द्यांवर कंगना विधान करतात, ज्यामुळे त्या अडचणीत देखील सापडतात. आता देखील त्यांनी असं वक्तव्य केलं, जे सध्या सर्वत्र चर्चेत आहे. महिलांच्या प्रगतीबद्दल आणि शरीरिक संबंधांबद्दल कंगना यांनी मोठं विधान केलं. महिलांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं तरी देखील समाज त्या महिलांकडे वाईट नजरेने पाहतो… याबद्दल कंगना यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र कंगना यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, कंगना यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उचलला आहे. कंगना म्हणाल्या, ‘आजच्या घडीला देखील महिलांकडे संशयाच्या दृष्टीने पाहिलं जातं… महिला यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या, त्यांच्या मेहनतीच्या जोरावर यांनी यश मिळवलं तरी, त्यांचं यश त्यांच्या चारित्र्याशी जोडलं जातं… जे खरंच खूपच निराशजनक आहे…’

पुढे कंगना म्हणाल्या, ‘महिला राजकारणात सक्रिय असो किंवा तिच्या प्रोफेशनल आयुष्यात फार पुढे गेलेली असेल… कायम महिलांच्या चारित्र्यांवर आणि यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. आजच्या मॉर्डन जगात देखील कुठे न कुठे महिलांना याच मानसिकतेने पाहिलं जातं… जर कोणती महिला कोणत्या क्षेत्रात मोठ्या स्थानी असेल तर, तिच्याबद्दल असं म्हटलं जातं, नक्कीच कोणासोबत तरी झोपली असेल, शारीरिक संबंध ठेवले असतील…’ असं देखील कंगना म्हणाल्या.

कंगना यांनी या गोष्टीवर देखील भर दिला की, जेव्हा एखादी स्त्री छान कपडे घालते आणि स्वतःला प्रभावीपणे सादर करते, तेव्हा अनेकदा तिच्या कृतींचे मूल्यमापन तिच्या चारित्र्याच्या संदर्भात केलं जातं. स्त्रिया जेव्हा नीटनेटके राहतात किंवा छान कपडे परिधान करतात, तेव्हा त्या पुरुषांना प्रभावित करण्यासाठीच असे करत आहेत, असा दावा समाज वारंवार करतो; ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं कंगना यांनी सांगितलं.

कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच त्यांचा ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमा प्रदर्शित झाला. . या सिनेमात दाखवण्यात आलं आहे की, एका दहशतवादी हल्ल्यादरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी 400 हून अधिक निरपराध लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव कसा धोक्यात घातला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला