दिल्ली मेट्रोमध्ये अभिनेत्रीकडून प्रवाशाला मारहाण, शिवीगाळ; अखेर CISF जवानाकडून मध्यस्थी

ट्रान्स अभिनेत्री बॉबी डार्लिंग दिल्ली मेट्रोतील एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. बॉबी डार्लिंगने मेट्रोमधील एका प्रवाशाला मारहाण आणि शिवीगाळ केली. या प्रकरणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये अभिनेत्रीकडून प्रवाशाला मारहाण, शिवीगाळ; अखेर CISF जवानाकडून मध्यस्थी
Bobby DarlingImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 7:01 PM

दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक बॉबी डार्लिंगचा दिल्ली मेट्रोतील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी एका पुरुष प्रवाशाला मारताना दिसत आहे. दिल्ली मेट्रोतील प्रवाशांचं भांडण पाहून सीआयएसएफ अधिकारी त्याठिकाणी येतो आणि तो भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतो. बॉबी डार्लिंग आणि संबंधित पुरुष प्रवाशादरम्यान एका क्षुल्लक कारणावरून भांडण झालं होतं, असं कॅप्शन देत एका युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

‘मनोरंजनासाठी मेट्रो ही सर्वोत्तम जागा आहे’, अशी प्रतिक्रिया एका युजरने या व्हिडीओवर दिली. तर ‘ही चित्रपटात काम करायची ना’, असं लिहित दुसऱ्या नेटकऱ्याने बॉबी डार्लिंगला ओळखण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की बॉबीच्या हातात एक पांढऱ्या रंगाची बॅग आहे. ती बॅग खेचण्याचा प्रयत्न दुसरा प्रवासी करत असतो. तर सीआयएसएफचा अधिकारी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. बॉबी डार्लिंग त्या प्रवासाला शिवीगाळ करते आणि त्याला मारते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर DMRC ने निवेदन देत घटनेची निंदा केली. ‘आम्ही अशा आपत्तीजनक घटनांची माहिती मिळवण्यासाठी फ्लाइंग स्क्वाडमधून तपास करत असतो. आम्ही लोकांना विनंती करतो त्यांनी अशा प्रकरणांची त्वरित तक्रार करावी आणि आम्हाला माहिती द्यावी. जेणेकरून त्यावर ताबडतोब कारवाई होऊ शकेल’, असं त्यांनी निवेदनात स्पष्ट केलं आहे.

हे सुद्धा वाचा

बॉबी डार्लिंगचं खरं नाव पंकज शर्मा आहे. ती ट्रान्स इंडियन अभिनेत्री आहे आणि आतापर्यंत तिने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. स्टाइल, मैंने दिल तुझको दिया, ना तुम जानो ना हम, दिल ने जिसे अपना कहा, जीना सिर्फ मेरे लिए, पेज 3, क्या कूल है हम, हंसी तो फंसी यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय तिने बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलंय. कहीं किसी रोज, कसौटी जिंदगी की, फेम गुरूकुल, क्योंकी सास भी कभी बहू थी, ससुराल सिमर का, इस प्यार को क्या नाम दूँ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.