जया यांच्याबद्दल अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ मोठा खुलासा, म्हणाले, तिने मला…
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ते दिसतात. अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीच्या नवीन सीनजला होस्ट करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे कायमच सीजनमध्ये आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करताना दिसतात. आता नुकताच एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना अत्यंत मोठा प्रश्न विचारला आहे.
एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना केबीसीच्या मंचावर विचारले की, तुम्ही शूटिंगमध्ये इतके जास्त बिझी असता मग जया बच्चन या तुम्हाला वेळ देत नाहीत म्हणून कधी बोलतात का? यावर अमिताभ बच्चन यांच्याकडून खास उत्तर देण्यात आलंय. अमिताभ बच्चन यांनी थेट सांगितले की, त्यांची शूटिंग कशाप्रकारे सुरू असते. तीन शिफ्टमध्ये अमिताभ बच्चन यांची शूटिंग सुरू असते.
अमिताभ बच्चन म्हणाले की, मी तीन शिफ्टमध्ये तीन वेगवेगळ्या चित्रपटांचे काम करतो. पहिली शिफ्ट सकाळी 7 ते 2 असते. दुसरी शिफ्ट 2 ते रात्री 10 असते आणि तिसरी शिफ्ट ही रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत असते. परत दुसऱ्या दिवशीही सर्वकाही सेम असते. अमिताभ बच्चन अशा शिफ्टमध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करत आहेत.
पुढे अमिताभ बच्चन हे म्हणाले की, उशीरा आल्याने किंवा वेळ देत नसल्यामुळे कधीच जया बच्चन यांनी तक्रार केली नाहीये. जया बच्चन या कायमच अमिताभ बच्चन यांना सपोर्ट करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांच्या वाईट काळातही जया बच्चन या त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असल्याचे बघायला मिळाले. अमिताभ बच्चन त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेले आहेत.
काही दिवसापूर्वीच जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. जया बच्चन म्हणाल्या की, अमिताभ बच्चन यांच्याकडे चार मोबाईल आहेत. मात्र, ते कधीच फोन उचलत नाहीत. जर कधी घरी काही झाले तर ते सरळ म्हणतात की, घरी इतकी मोठी घटना झाली आणि तुम्ही मला सांगितले पण नाही.
एखादी घटना झाली की, सर्वात अगोदर त्यांनाच फोन करतो…पण ते कधीच फोन उचलत नाहीत आणि परत म्हणतात की, मला तुम्ही सांगत नाहीत. अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीच्या मंचावर कायमच आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसतात. अमिताभ यांच्या या शोमध्ये काही दिवसांपूर्वी श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा हे पोहोचले होते.
