AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असरानी यांच्यानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला मृत्यूची चाहूल; म्हणाला, मृत्यू सणाशी संबंधित असेल तर…

Asrani Death: राष्ट्रीय सण आणि मृत्यू... यांचा काय आहे संबंध? असरानी यांच्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने स्वतःच्या मृत्यूबद्दल केलंय मोठं वक्तव्य, सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा...

असरानी यांच्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला मृत्यूची चाहूल; म्हणाला, मृत्यू सणाशी संबंधित असेल तर...
फाईल फोटो
| Updated on: Oct 24, 2025 | 10:54 AM
Share

Asrani Death: कधी कोणाचा मृत्यू होईल काहीही सांगता येत नाही… 2025 मध्ये अनेक लोकप्रिय आणि दिग्गजांनी शेवटचा श्वास घेतला. ज्यामुळे देशभरात शोककळा पसरली. काही दिवसांपूर्वी म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते असरानी यांचं निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी असरानी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीमध्ये दुःखद वातावरण आहे.. प्रत्येक जण आपल्या अंदाजाने अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहे… पण असरानी यांच्या निधनानंतर एका बॉलिवूड अभिनेत्यानेही आयुष्यातील अंतिम निरोपाची इच्छा व्यक्त केली आहे.

मृत्यूबद्दल काय म्हणाले अनू कपूर?

ज्या अभिनेत्याने स्वतःच्या मृत्यूबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता अनू कपूर आहे… नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अनू कपूर यांनी स्वतःच्या मृत्यूबद्दल एक इच्छा व्यक्त केली आहे. असरानी यांना त्यांचे अंत्यसंस्कार शांततेत आणि एकांतात व्हावेत अशी इच्छा होती. यामुळे अनु कपूर यांनाही अशीच इच्छा व्यक्त केली आहे.

अनू कपूर म्हणाले, जर त्यांचा मृत्यू 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सारख्या राष्ट्रीय सणाला किंवा दिवाळी, होळी किंवा ईद सारख्या कोणत्याही सणाला झाला तर त्यांना त्यांचं अंतिम संस्कार गुप्तपणे आणि कोणालाही त्रास न देता झाले पाहीजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

अनू कपूर म्हणाले, ‘असरानी यांच्या मृत्यूने मला प्रेरित केलं आहे. जेव्हा दुनिया नावाच्या हॉटेलमधून चेकआऊट करण्याची वेळ येईल तेव्हा ती वेळ , तिथी सणाशी संबंधित असली पाहिजे… 15 ऑगस्ट, 26 जानेवारी… किंवा कोणतं सण… दिवाळी, होळी.. ईद… माझ्यावर अंत्यसंस्कार देखील गुपित झाले पाहिजे… मला कोणाला त्रास द्यायचा नाही… आणि या जगावर मला ओझ होऊन जगायचं नाही…’

अनू कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यंनी ‘मंडी’, ‘उत्सव’, ‘मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘घायल’, ‘हम’, ‘डर’, ‘सरदार’, ‘ओ जय जगदीश’, ‘ऐतराज’ आणि ‘7 खून माफ’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय अनेक शो देखील त्यांनी केले आहे. आजही ते कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

अभिनेते असरानी यांचं निधन…

20 ऑक्टोबर रोजी असरानी यांचं निधन झालं… इच्छेनुसार असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अंतिम संस्कार सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत शांततेत आणि गुप्ततेने करण्यात आले. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.