लवकरच ‘बाबा’ बनणार अपारशक्ती खुराना, सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले गमतीदार कॅप्शन!

आकृति आणि अपारशक्ती लवकरच ‘आई-बाबा’ होणार आहेत. अभिनेत्याने एक सुंदर फोटो शेअर करुन याची घोषणा केली आहे. फोटोमध्ये अपारशक्ती पत्नीच्या बेबी बंपला कीस करताना दिसत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी स्मित देखील दिसत आहे. फोटोसह अभिनेत्याने एक उत्तम कॅप्शनही लिहिले आहे, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

लवकरच ‘बाबा’ बनणार अपारशक्ती खुराना, सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले गमतीदार कॅप्शन!
अपारशक्ती खुराना

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) देखील हळूहळू भाऊ आयुष्मान खुराना प्रमाणेच मनोरंजन विश्वात पाय पसरत आहे. पण मोजक्या भूमिका करूनही अभिनेत्याची फॅन फॉलोव्हिंग जोरदार आहे. ‘स्त्री’ सारख्या चित्रपटात अभिनेत्याने सहय्यक भूमिका साकारून सर्वांचे मन जिंकले आहे. अपारशक्तीने नुकतीच एक गोड बातमी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे (Bollywood Actor Aparshakti Khurana share cute photo and caption with Wife).

अपारशक्ती खुराना याने अलीकडेच पत्नी आकृति खुरानाच्या गरोदरपणाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर करत एक मोनोक्रोम फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आकृति आणि अपारशक्ती लवकरच ‘आई-बाबा’ होणार आहेत. अभिनेत्याने एक सुंदर फोटो शेअर करुन याची घोषणा केली आहे.

अपारशक्तीने शेअर केली गोड बातमी

फोटोमध्ये अपारशक्ती पत्नीच्या बेबी बंपला कीस करताना दिसत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी स्मित देखील दिसत आहे. फोटोसह अभिनेत्याने एक उत्तम कॅप्शनही लिहिले आहे, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या ‘स्त्री’ फेम अभिनेत्याने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, जर लॉकडाऊनमध्ये काम वाढवता आले नाही, तर आम्हाला असे वाटते की निदान कुटुंबा तरी वाढवावे. म्हणजेच ही गोड बातमी शेअर करत त्याने लॉकडाऊनमध्ये कुटुंब नियोजन का निवडले, याचे गमतीदार उत्तर लिहिले आहे. अपारशक्तीच्या या गोड बातमीने प्रत्येकजण आनंदी झाला आहे आणि त्याचे खूप अभिनंदन केले जात आहे.

पाहा अपारशक्तीची पोस्ट

 (Bollywood Actor Aparshakti Khurana share cute photo and caption with Wife)

अभिनेता कार्तिक आर्यन, सनी सिंग, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा आणि इतर सेलेब्सनी या पोस्टवर कमेंट करत या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. कार्तिकने लिहिले, “अभिनंदन” तर सनी पुढे म्हणाला, “अभिनंदन मेरे भाई, तुम्हाला दोघांना खूप खूप प्रेम!! ️ कमेंटमध्ये, मुकेशने देखील या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. यासह चाहतेही बऱ्याच कमेंट्स करून अभिनेत्याचे अभिनंदन करत आहेत.

‘दंगल’मधून केली सुरुवात!

अभिनेता अपारशक्तीने आपल्या करिअरची सुरूवात आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात अपारशक्तीची एक सहायक अभिनेत्याची भूमिका होती, परंतु तरीही या चित्रपटात त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर त्याने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘स्त्री’, ‘लुका चुप्पी’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. या सर्वांमध्ये तो एक सहायक अभिनेता म्हणून चांगलाच चर्चेत आला आहे. परंतु, त्याचा कारकीर्दीचा आलेख झपाट्याने वाढत आहे.

वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर, अपशक्ती आणि आकृती यांची भेट चंडीगडमध्ये एका नृत्य वर्गात झाली होती. दोघेही आधी एकमेकांचे चांगले मित्र बनले आणि मग त्यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर 2014साली लग्न केले. आकृती ही ‘फेरी इव्हेंट्स’ नावाच्या कंपनीची संस्थापक आहे. तिची आणि अपारशक्ती खुरानाची जोडी खूपच क्युट आहे. दोघेही बर्‍याचदा आपल्या कामापासून दूर राहून एकमेकांसोबत छान वेळ घालवत असतात.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आरजे होता अपारशक्ती

2016च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या ‘दंगल’ या चित्रपटाद्वारे अपारशक्तीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी त्याला ‘सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार’ देण्यात आला होता. यानंतर, ती ‘स्त्री’, ‘लुका चुप्पी’ आणि ‘पति पत्नी और वो’ या लोकप्रिय चित्रपटांमध्येही तो दिसला. सिनेमा जगात प्रवेश करण्यापूर्वी, अपारशक्ती दिल्लीतील एका लोकप्रिय रेडीओ वाहिनीत आरजे म्हणून काम करत होता.

(Bollywood Actor Aparshakti Khurana share cute photo and caption with Wife)

हेही वाचा :

Photo : बॅलन्सिंग लाईफ, अमृता खानविलकरचं योगा सेशन

Video | कॅन्सरशी झुंज देणाऱ्या किरण खेर यांनी मानले चाहत्यांचे आभार, लेकालाही दिला ‘हा’ खास सल्ला!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI