पूजेवर लाखो रूपये खर्च करतो पण मला एकही रूपया… गोविंदाच्या पत्नीच्या आरोपाने खळबळ, तो कधीच..
बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. आता त्यामध्येच अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केली आहेत. नुकताच गोविंदाच्या अफेअरबद्दल बोलताना देखील सुनिता आहुजा दिसल्या.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. आता गोविंदाची पत्नी सुनिता आहूजा या थेटपणे यावर पहिल्यांदाच जाहिरपणे बोलताना दिसल्या आहेत. यादरम्यान गोविंदावर गंभीर आरोप करत सुनिता आहूजा यांनी म्हटले की, गोविंदा हा मला पैसे देत नाही. गोविंदा मागील काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये फार काही दिसला नाही. मात्र, असे असले तरीही त्याने एक मोठा काळ नक्कीच चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आता चित्रपटांपेक्षा तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जोपर्यंत मी गोविंदाला रंगेहात पकडत नाही, तोपर्यंत मी यावर फार काही बोलणार नसल्याचे सुनिता आहूजा यांनी म्हटले.
सुनिता आहूजा नुकताच पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान बोलताना त्यांनी म्हटले की, गोविंदा हा पूजावर लाखो रूपये खर्च करण्यासाठी लगेचच तयार होतो. आमच्या घरात देखील गोविंदाचा एक पुजारी आहे. तो सांगतो की, पूजा करा 2 लाख द्या. मी त्याला म्हणते की, तू स्वत: पूजा केली पाहिजे. पुजाऱ्यांकडून केलेली पूजा काहीच तुझ्या कामाला येणारी नाही, असे मी त्याला म्हणते.
पुढे बोलताना सुनिता आहूजा यांनी म्हटले की, जी पूजा तू स्वत: करशील, त्यालाच देव स्वीकारत असतो. मुळात म्हणजे मी पुजाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या पुजांवर विश्वास ठेवत नाही. मी जर दान करत असेल तर काही चांगले करते. मी स्वत: च्या हातांनी दान करते. कारण त्याचे पुण्य मला मिळते. पुढे बोलताना सुनिताने म्हटले की, गोविंदाच्या जवळची लोक त्याचे कान भरतात आणि त्याला चुकीच्या गोष्टींचा सल्ला देतात.
माझी इच्छा आहे की, वृद्धाश्रम आणि जनावरांसाठी घर बांधण्याची पण मला माझ्या स्वत:च्या पैशातून हे सर्व करायचे आहे. याकरिता मी एक रूपया देखील गोविंदाला मागणार नाहीये. कारण तो मला पैसेच देत नाही. तो त्याच्या चमच्यांना पैसे वाटतो. आता गोविंदाच्या पत्नीने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून गोविंदाची पत्नी त्याच्याबद्दल मोठे विधान करताना दिसत आहे.
