हा बॉलिवूड अभिनेता वयाच्या 41 व्या वर्षी करतोय या परीक्षेची तयारी; शुटींगसोबत परीक्षेचही आहे टेन्शन
एक असा अभिनेता आहे जो वयाच्या 41 व्या वर्षी चक्क पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे. जूनमध्ये त्याची परीक्षा असून त्याचवेळी त्याच्या एका नवीन चित्रपटाचे शुटींगही सुरु होत आहे.अभिनेत्याने आयुष्यात सुरु असलेल्या या दोन्ही प्रवासाचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलिवूडमधील कलाकारांच्या शिक्षणाबद्दल नेहमीच चर्चा केली जाते. तसेच अभिनेता-अभिनेत्रींचे किती शिक्षण झालं आहे? याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सध्या अशाच एका अभिनेत्याची चर्चा सुरु आहे. जो चक्क 41 व्या वर्षी एका परीक्षेची तयारी करतोय. तो अभ्यासात मग्न असल्याचे आणि नोट्स काढत असल्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा अभिनेता वयाच्या 41व्या वर्षी आपलं शिक्षण पूर्ण करत आहे.
सायकॉलॉजी ऑनर्सच्या परिक्षेची तयारी
हा अभिनेता म्हणजे हर्षवर्धन राणे. ज्याला ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. सध्या त्याच्या आगामी रोमँटिक चित्रपट ‘दीवानियत’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याच दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, जून महिन्यात त्यांच्या सायकॉलॉजी ऑनर्सच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा आहेत, ज्यासाठी ते खूप अभ्यास करत आहेत. इन्स्टाग्रामवर काही फोटो त्याने शेअर केले आहेत. हर्षवर्धनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, जूनमध्ये सायकॉलॉजी ऑनर्सच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा आहेत. डोक्यात एकच ट्यून सुरू आहे – मला चांगलं करायचं आहे.” शेअर केलेल्या फोटोंमध्ये राणे स्टडी टेबलवर ठेवलेल्या नोट्स वाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हर्षवर्धन सध्या सायकॉलॉजीमध्ये पदवी घेत आहेत आणि यापूर्वीही त्याने चाहत्यांसोबत याबाबत माहिती शेअर केली आहे.
View this post on Instagram
‘दीवानियत’ चित्रपटाची शूटिंग आणि तगडं स्क्रिप्ट
मजेदार आणि मिश्किल अंदाजात त्याने त्याची व्यथाही व्यक्त केली आहे आणि लिहले आहे, “फक्त ‘दीवानियत’ हे शीर्षक मिळाले नाही, कारण ते कुणाकडे तरी आहे. पण तुम्ही आणि देव या ड्रीम टीमसोबत आहात. ” निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट याच वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
‘सनम तेरी कसम’नंतर हर्षवर्धनचा पुन्हा एक यशस्वी प्रवास
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, हर्षवर्धन राणे याचा ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. परंतु, अलीकडेच हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आणि त्याने जगभरात 51.1 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे, पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘सनम तेरी कसम’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
हर्षवर्धन राणे यांच्या या मेहनती आणि समर्पणामुळे त्याचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एकीकडे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे सायकॉलॉजीच्या अभ्यासातही लक्ष केंद्रित करणारा हा अभिनेता खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. ‘दीवानियत’ चित्रपट आणि त्यांच्या सायकॉलॉजीच्या परीक्षेसाठी त्यांना चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
